ETV Bharat / state

पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये छट पूजा साजरी करण्यास बंदी - ban on chhatpuja in pune

पिंपरी-चिंचवडसह पुण्यातही उत्तर भारतीय बांधवांच्या छट पूजा सणास महानगर पालिका प्रशासनाने परवानगी नाकारली असून यावर्षी छट पूजा सार्वजनिकरित्या साजरी होणार नाहीय. यासंबंधी दोन्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पत्रक काढले आहे.

pune municipal corporation commissioner
पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये छट पूजा साजरी करण्यास बंदी
author img

By

Published : Nov 19, 2020, 7:40 PM IST

पुणे : पिंपरी-चिंचवडसह पुण्यातही उत्तर भारतीय बांधवांच्या छट पूजा सणास महानगर पालिका प्रशासनाने परवानगी नाकारली असून यावर्षी छट पूजा सार्वजनिकरित्या साजरी होणार नाहीय. यासंबंधी पत्रक दोन्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांनी काढले आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी छट पूजा करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच घरी कुटुंबासह छट पूजा सण साजरा करत असताना कोरोना संदर्भातील नियम पाळण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उत्तर भारतीय बांधवांना केले आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये छट पूजा साजरी करण्यास बंदी
पिंपरी-चिंचवड शहरात दरवर्षी मोशी परिसरात मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय बांधव छट पूजा सण उत्साहात साजरा करतात. मात्र यावर्षी कोरोना महामारीमुळे छट पूजेवर बंदी घालण्यात आली आहे.
छट पूजेला सार्वजनिक रुप येऊ नये म्हणून बंदी?
यासंदर्भात महानगर पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, छट पूजा घरात राहून साजरी करावी. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सणाला सार्वजनिक स्वरुप प्राप्त होऊ नये, यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी गर्दी करू नये. कोरोनाविषयी सतर्क राहणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकांनी मास्क वापरावे. अन्यथा त्या व्यक्तीकडून पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
महानगर पालिकेने काढलेल्या पत्रकातील आदेश
  1. तलाव / नदी किनारी छटपुजेस होणारी गर्दी लक्षात घेता कोविड १९ मार्गदर्शक तत्त्वांचे विशेषत: समाजिक अंतर राखणे, इत्यादीचे पालन होणार नाही. त्या अनुषंगाने तलाव / नदी किनारी अथवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी छटपुजेस परवानगी देण्यात येणार नाही. त्यामुळे अशा ठिकाणी भाविक जमा होणार नाहीत, याची पोलीस विभागाने दक्षता घ्यावी.
  2. भाविकांनी छटपूजा घरगुती पद्धतीने साजरी करावी. खासगी जागेत / घरात सुद्धा छटपुजा करताना सामाजिक शारिरीक अंतर राखण्यात येईल, याची आयोजकांनी /नागरिकांनी खबरदारी घ्यावी.
  3. कोविड विषयक घ्यावयाची महत्त्वाची खबरदारी, संबंधित नियम याबाबत देखील उपायुक्त सहाय्यक आयुक्त / क्षेत्रिय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सातत्याने जनजागृती करायची आहे. तसेच या अनुषंगाने नियम भंग करणाऱ्यांवर, मास्क सुयोग्य पद्धतीने परिधान न करणे, रस्त्यावर थुंकणे, विना परवानगी कार्यक्रम आयोजित करणे, गर्दी करण्यांवर दंडात्मक कारवाई उपायुक्त/ सहाय्यक आयुक्त / क्षेत्रिय अधिकारी व पोलीस प्रशासन यांनी नियमितपणे करायची आहे.
  4. यापूर्वी वेळोवेळी परवानगी देण्यात आलेले सर्व उपक्रम, त्यासाठी निर्गमित केलेल आदेश व मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील आदेशापर्यंत सुरू राहतील.
  5. संदर्भिय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.
  6. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने यापूर्वी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. कोवीड-१९ च्या प्रतिबंधासाठी या कार्यालयाद्वारे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशांचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारा व्यक्ती, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ अन्वये दंडनिय अपराध केला, असे समजून कारवाईस पात्र राहील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.