ETV Bharat / state

आठवीच्या पुस्तकात सुखदेव यांच्याजागी कुर्बान हुसैन फासावर; संबंधितांवर कारवाईची मागणी - पुणे लेटेस्ट बातमी

'हा सुखदेव यांचाच नव्हे तर समस्त क्रांतिकारकांचाच अपमान आहे', असे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी म्हटले आहे. ही सर्व पुस्तके मागे घेऊन संबंधितांवर त्वरित निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आनंद दवे यांनी केली आहे. लेखी तक्रार देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

इयत्ता आठवीच्या पुस्तकात सुखदेव यांच्याजागी कुर्बान हुसैन फासावर गेल्याचा उल्लेख; संबंधितांवर कारवाईची ब्राम्हण महासंघाची मागणी

author img

By

Published : Jul 17, 2020, 12:54 PM IST

पुणे - शालेय अभ्यासक्रमातील इयत्ता ८ वीच्या पुस्तकात हुतात्मा भगतसिंग, राजगुरू यांच्याबरोबर फाशी गेलेले गेलेले तिसरे नाव कुर्बान हुसैन असे लिहिले आहे. यामुळे सर्वचस्तरात एकच संतापाची लाट उमटली आहे. 'हा सुखदेव यांचाच नव्हे तर समस्त क्रांतिकारकांचाच अपमान आहे', असे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी म्हटले आहे. ही सर्व पुस्तके मागे घेऊन संबंधितांवर त्वरित निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आनंद दवे यांनी केली आहे. लेखी तक्रार देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

इयत्ता आठवीच्या पुस्तकात सुखदेव यांच्याजागी कुर्बान हुसैन फासावर गेल्याचा उल्लेख; संबंधितांवर कारवाईची ब्राम्हण महासंघाची मागणी

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांनी हौतात्म्य पत्करले हा इतिहास सर्वांनाच माहिती आहे. पण बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकात एक घोडचूक करण्यात आली आहे. भगतसिंग, राजगुरु यांच्यासह फासावर गेलेल्या तिसऱ्या क्रांतिकारकाच्या नावात ही अक्षम्य चूक करण्यात आल्याचे ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी निदर्शनास आणले आहे. बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकात यदुनाथ थत्ते यांचा ‘माझ्या देशावर प्रेम आहे’ असा धडा आहे. या धड्यात व्यक्ती शाळकरी मुलांनी देशप्रेमाबद्दल समजावून सांगत आहे. यावेळी त्यांच्यातील संवाद धड्यात देण्यात आला असून एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नात ही घोडचूक करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.