ETV Bharat / state

मावळ परिसरात पर्यटकांची गर्दी; बजरंग दलाचा पर्यटकांना न येण्याचा इशारा - tourism of mawal news

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन क्षेत्रावर जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी आदेश जारी केले आहेत. तसेच संबधित ग्रामपंचायतीकडूनही पर्यटनास बंदी केली आहे. मात्र, वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणारे पर्यटक या आवाहनाकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. त्यामुळे बजरंग दलाने पर्यटकांना न येण्याचे आवाहन केले आहे.

मावळ परिसरात पर्यटकांची गर्दी
मावळ परिसरात पर्यटकांची गर्दी
author img

By

Published : Jul 6, 2020, 8:23 AM IST

पुणे - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पर्यटनस्थळावर जाण्यास पर्यटकांना मज्जाव करण्यात आला आहे. परंतु, अनेक पर्यटक हे नियमांची पायमल्ली करून बिनधास्त वर्षाविहार करताना पाहायला मिळत आहेत. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने काही पर्यटकांनी पवना धरण परिसरात गर्दी केली होती. कोरोनाचा धोका विचारात घेता आता पर्यटकांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून मावळ परिसरात न येण्याचे आवाहन वजा इशारा देण्यात आला आहे.

मावळ परिसरात पर्यटकांची गर्दी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन क्षेत्रावर जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी आदेश जारी केले आहेत. तसेच संबधित ग्रामपंचायतीकडूनही पर्यटनास बंदी केली आहे. मात्र, वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणारे पर्यटक या आवाहनाकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत.

रविवारी पवना धरण परिसरासह तुंग, तिकोणा, विसापूर, लोहगड किल्ल्यावरही पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असून तेथील पर्यटक मावळ परिसरात येत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. तसेच त्यांच्यामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भाव होण्याच्या शक्यतेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पर्यटकांना मावळ परिसरात न येण्याचे इशारावजा आवाहन केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.