पुणे- आमच्यासाठी कंगनाचा विषय महत्वाचा नाही, तर शेतकऱ्यांचा विषय महत्वाचा आहे. माध्यमांनी कंगनाचा विषय बंद करावा, असे वक्तव्य राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ येथे एका कामासाठी बच्चू कडू पुणे येथे आले होते.
शिक्षण विभागातील नियम, वाटा व बेकायदेशीर काम याबाबत राजकुमार वाडकर यांनी तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सुनावणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ येथे आयोजित करण्यात आली होती. या सुनावणीसाठी राज्यमंत्री बच्चू कडू पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांना कंगना रणौतबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत त्यांनी मत व्यक्त केले.
हेही वाचा-बाबरी पाडणारे आम्हीच आहोत’; कंगनाच्या ‘बाबर सेना’ टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. त्यानंतर या प्रकरणावरुन दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. बुधवारी कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबई महापालिका आणि राज्य सरकारवर निशाणा साधला होता.