ETV Bharat / state

तेव्हा शिवसेनेचे मंत्री झोपा काढत होते का? आमदार बच्चू कडूंचा शिवसेनेला टोला

शिवसेनेच्यावतीने राज्यभरातील विमा कंपन्यांच्या कार्यालयावर मोर्चे काढण्यात आले होते. त्यावर आमदार बच्चू कडू यांनी म्हटले, की आंदोलन करण्यापूर्वी कॅबिनेट बैठकीत हा प्रस्ताव आला असताना शिवसेनेचे मंत्री झोपा काढत होते का? असा सवाला त्यांनी यावेळी उपस्थित केला.

आमदार बच्चू कडूंचा शिवसेनेला टोला
author img

By

Published : Jul 21, 2019, 5:09 PM IST

पुणे - विमा कंपन्या लुबाडण्यासाठी, नफा कमविण्यासाठीच आल्या आहेत. त्यामुळे या नफ्यात कृषीमंत्र्यांना, अधिकाऱ्यांना किती पैसे मिळाले हे तपासणे गरजेचे आहे. शिवसेनेने आता मोर्चा काढला, हरकत नाही. पण कॅबिनेटमध्ये निर्णय होत असताना शिवसेनेचे मंत्री झोपा काढत होते का? असा सवाल प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला.

आमदार बच्चू कडूंचा शिवसेनेला टोला

शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे त्वरित देण्यात यावे, या मागणीसाठी राज्यभरातील कंपन्यांच्या कार्यालयावर शिवसेनेच्यावतीने मोर्चे काढण्यात आले होते. त्यावर विचारले असता आमदार बच्चू कडू म्हणाले, कॅबिनेटमध्ये आल्याशिवाय हा विषय समोर आला नसणार. शिवसेनेच्या मंत्र्यांना तेव्हाच याला विरोध करता आला असता. जर कॅबिनेटमध्ये त्यांनी विरोध केला नसेल तर मग आंदोलन करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही.

आमदारांच्या वेतनात, सातव्या वेतन आयोगात गोंधळ होत नाही. जिथे जिथे शेतकऱ्यांसाठी योजना राबविल्या जातात तिथे तिथे कायमच हा गोंधळ होतो. त्यामुळे आंदोलन करण्यापूर्वी कॅबिनेट बैठकीत हा प्रस्ताव आला असताना शिवसेनेचे मंत्री झोपा काढत होते का? याचे उत्तर द्यावे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.

राज्यात विरोधी पक्ष आहेच कुठे?

राज्यात विरोधीपक्ष आहेच कुठे? असा सवालही बच्चू कडू यांनी यावेळी उपस्थित केला. ते म्हणाले, गेली ५ वर्षे राधाकृष्ण विखेंचे भाजप मंत्र्यासोबत, मुख्यमंत्र्यांसोबत प्रेमसंबंध होते. ५ वर्षे ते भाजपचेच विरोधी पक्षनेते होते हे सिद्ध झाले. विरोधी पक्षातले अजून कितीजण सत्तेत जातात हा पुन्हा प्रश्न आहे. त्यामुळे देशात विरोधी पक्ष आहे की नाही हे तपासण्याची गरज आहे.

आदित्य ठाकरेंनी माती अंगाला लावून घेणे गरजेचे

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद दौर्याबद्दल बोलताना ते म्हणाले, आदित्य ठाकरेंनी निव्वळ मैदानावरील कुस्त्या न पाहता माती अंगाला लावून घेणे गरजेचे आहे. माती अंगाला लागली तरच तो सच्चा शिवसैनिक आहे, असे म्हणता येईल. एसीतून दौरा काढण्यापेक्षा खालच्या पातळीवर येऊन सुरूवात करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

Intro:विमा कंपन्या लुबाडण्यासाठी, नफा कमविण्यासाठीच आल्या आहेत..त्यामुळे या नफ्यात कृृषिमंत्र्यांना किती, अधिकाऱ्यांना किती पैसे मिळाले हे तपासणे गरजेचे आहे. शिवसेने आता मोर्चा काढला हरकत नाही. पण कॅबिनेटमध्ये निर्णय होत असताना शिवसेनेचे मंत्री झोपा काढत होते का ? असा सवाल प्रहार संघटनेचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला.

शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे त्वरित देण्यात यावे या मागणीसाठी राज्यभरातील कंपन्यांच्या कार्यालयावर शिवसेनेच्या वतीने मोर्चे काढण्यात आले होते. त्यावर विचारले असता आमदार बचू कडु बोलत होते. अधिक बोलताना कडू म्हणाले, कॅबिनेटमध्ये आल्याशिवाय हा विषय समोर आला नसणार. शिवसेनेच्या मंत्र्यांना तेव्हाच याला विरोध करता आला असता..जर कॅबिनेटमध्ये त्यांनी विरोध केला नसेल तर मग आंदोलन करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही..

आमदारांच्या वेतनात, सातव्या वेतन आयोगात गोंधळ होत नाही. जिथे जिथे शेतकऱ्यांसाठी योजना राबविल्या जातात तिथे तिथे कायमच हा गोंधळ होतो..त्यामुळे आंदोलन करण्यापूर्वी शिवसेनेने कॅबिनेट बैठकीत हा प्रस्ताव आला असताना त्यांचे मंत्री झोपा काढत होते का? याचे उत्तर द्यावे अशी मागणी बचू कडू यांनी केली. Body:राज्यात विरोधी पक्ष आहेच कुठे?
राज्यात विरोधी पक्ष आहेच कुठे असा सवाल उपस्थित करत बचू कडू म्हणाले गेली पाच वर्षे राधाकृष्ण विखेंचे भाजप मंत्र्यासोबत, मुख्यमंत्र्यांसोबत प्रेमसंबंध होते..पाच वर्षे ते भाजपचेच विरोधी पक्षनेते होते हे सिद्ध झाले..विरोधी पक्षातले अजून कितीजण सत्तेत जातात हा पुन्हा प्रश्न आहे..त्यामुळे देशात विरोधी पक्ष आहे की नाही हे तपासण्याची गरज आहे..
Conclusion:आदित्य ठाकरेंनी माती अंगाला लावून घेणे गरजेचे
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद दौर्याबद्दल बोलताना ते म्हणाले,
आदित्य ठाकरेंनी निव्वळ मैदानावरील कुस्त्या न पाहता माती अंगाला लावून घेणे गरजेचे आहे..माती अंगाला लागली तरच तो सच्चा शिवसैनिक आहे असे म्हणता येईल... एसीतून दौरा काढण्यापेक्षा खालच्या पातळीवर येऊन सुरवात करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.