ETV Bharat / state

पुण्यात नारळाच्या झाडाचे डोहाळे जेवण; पहिला तुरा आल्याने भरली ओटी - नारळाच्या झाडाचे डोहाळे जेवण

पुण्यात नारळाच्या झाडाचे डोहाळे जेवण करण्यात आले. मैत्रीणींना ओटी भरण्यासाठी बोलावले. झाडाला साडी नेसवून शृंगार केला. डोहाळे गीत गात एखाद्या गर्भवती बाईचे ओटीभरण होते. त्याचप्रमाणे नारळाच्या झाडाची ओटी भरण्यात आली.

नारळाच्या झाडाचे डोहाळे जेवण करताना महिला
author img

By

Published : Aug 28, 2019, 10:54 AM IST

Updated : Aug 28, 2019, 11:47 AM IST

पुणे - गर्भवती महिलेचे डोहाळे पुरवल्याचे आपण ऐकले असेल. मात्र, पुण्यात एका वृक्षप्रेमी महिलेने नारळाच्या झाडाचे डोहाळे जेवण केले. नारळाच्या झाडाला पहिला तुरा आल्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी झाडाला साडी नेसवून एखाद्या गर्भवती महिलेसारखा शृंगार करण्यात आला होता.

पुण्यात नारळाच्या झाडाचे डोहाळे जेवण करताना महिला

हे वाचलं का? - पुणे जिल्ह्यात दूध उत्पादनात मोठी घट; शेतकरी चिंताग्रस्त

नीता यादवाड, असे या वृक्षप्रेमी महिलेचे नाव आहे. त्या शहरातील कर्वेनगर परिसरात राहतात. त्यांच्या बंगल्याच्या आजूबाजूला अनेक वृक्ष आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी कोकण विद्यापीठातून नारळाचे झाड आणून घरातील बागेत लावले. मात्र, पुरेशा सुर्यप्रकाशाअभावी ते झाड वाढणासे झाले. त्यानंतर त्यांनी ते झाड तिथून काढून दुसऱ्या ठिकाणी लावले. त्याला पाणी देऊन ते जीवंत राहील याची पूर्ण खबरदारी घेतली. गेल्या ३ आठवड्यांपूर्वी त्याला पहिला तुरा आला. त्यामुळे आपल्या नारळाच्या झाडाला नारळ येणार या आनंदात त्यांनी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ठेवला. मैत्रीणींना ओटी भरण्यासाठी बोलावले. झाडाला साडी नेसवून शृंगार केला. डोहाळे गीत गात एखाद्या गर्भवती बाईचे ओटीभरण होते त्याचप्रमाणे नारळाच्या झाडाची ओटी भरण्यात आली.

Intro:महिलांचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आपण पाहिला असेल, ऐकला असेल..एखाद्या झाडाचे डोहाळे पुरविल्याचे याआधी कधी ऐकले का? नाही ना? पण हे पुण्यात घडले..नारळाच्या झाडावर असलेल्या प्रेमापोटी एका महिलेने झाडाला तुरा आला म्हणून चक्क डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ठेवला..जणू एखाद्या महिलेचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे या थाटात त्यांनी हा कार्यक्रम साजरा केला..नारळाच्या झाडाला साडी नेसवून एखाद्या गर्भार महिलेसारखा शृंगारही केला होता...Body:पुण्याच्या कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या नीता यादवाड यांनी हा कार्यक्रम साजरा केला..वृक्षप्रेमी असलेल्या नीता यादवाड यांच्या बंगल्याच्या आसपास अनेक वृक्ष आहेत..काही वर्षापूर्वी त्यांनी कोकण विद्यापिठातुन नारळाचे झाड आणले आणि बागेत लावले होते..परंतु पुरेशा सूर्यप्रकाशाअभावी ते झाड वाढेनासे झाले..त्यामुळे मग त्यांनी ते झाड तिथून काढले आणि इतर ठिकाणी लावले..त्याला पाणी देऊन
खत देऊन ते जिवंत राहील याची पूर्ण खबरदारी त्यांनी घेतली...आणि तीन आठवड्यापूर्वी त्याला तुरा आला..Conclusion:आपल्या झाडाला आता नारळ येणार या आनंदात त्यांनी डोहाळे जेवनाचा कार्यक्रम ठेवण्याचे निश्चित केले..त्यानंतर ओटीभरणासाठी मैत्रिणींना बोलावले..
झाडाला साडी नेसवून शृंगार केला..डोहाळे गीत गात एखाद्या गर्भार बाईचे जसे ओटीभरण होते, अगदी तसेच ओटीभरण नीता यांनी झाडाचे केले...
Last Updated : Aug 28, 2019, 11:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.