ETV Bharat / state

पिंपरीत बुरख्याचा गळाफास बसून चिमुकलीचा मृत्यू - Death of Sumaiya Safil Sheikh

सुमय्याचे पालक नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. सुमैय्या मोठ्या बहिणींसोबत घरातच खेळत होती. सुमैय्या एका खोलीत आणि तिच्या बहिणी दुसऱ्या खोलीत होत्या. त्याचदरम्यान, बुरख्याचा झोपाळा केला असता तो खेळत असताना पाय निसटल्याने अचानक तिच्या गळ्याभोवती फास अडकला. दुसऱ्या खोल्यांमध्ये असलेल्या बहिणींना काही कळायच्या आत सुमय्याचा मृत्यू झाला.

baby girl dies of strangulation playing zopla in Pimpri, pune
पिंपरीत घरात झोपाळा खेळताना बुरख्याचा गळाफास बसून चिमुकलीचा मृत्यू
author img

By

Published : Aug 31, 2021, 5:33 PM IST

पिंपरी-चिंचवड - शहरातील रुपीनगर चिखली परिसरात एका घरात चिमुकली खेळत असताना बुरख्याचा गळफास बसल्याने आठ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही घटना रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली आहे. सुमैय्या सफिल शेख असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

झोपाळावरून पाय घसरून गळ्याला अडकला फास -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमय्याचे पालक नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. सुमैय्या मोठ्या बहिणींसोबत घरातच खेळत होती. सुमैय्या एका खोलीत आणि तिच्या बहिणी दुसऱ्या खोलीत होत्या. त्याचदरम्यान, बुरख्याचा झोपाळा केला असता तो खेळत असताना पाय निसटल्याने अचानक तिच्या गळ्याभोवती फास अडकला. दुसऱ्या खोलीमध्ये असलेल्या बहिणींना काही कळायच्या आत सुमैय्याचा मृत्यू झाला. सुमैय्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून घोषित केले. शेख दाम्पत्यांना चार मुली असून सुमैय्या ही सर्वात लहान होती.

हेही वाचा - उद्यापासून (1 सप्टेंबर) EPF, बॅंक, LPG, OTT, रेशन कार्डच्या या नियमांमध्ये होणार बदल, असा होईल तुमच्यावर परिणाम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.