ETV Bharat / state

Auto Driver Try To Rape On Girl : रिक्षा चालकाचा तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न, पुण्यातील घटनेने खळबळ - तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न

पुण्यात रिक्षा चालकाने तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनिकेत रिशू कुमार या रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Auto Driver Try To Rape On Girl
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jun 21, 2023, 2:01 PM IST

पुणे : कंपनीतून रिक्षाने घरी परतणाऱ्या तरुणीवर रिक्षा चालकाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. ही घटना 20 जून रोजी पुण्यातील काळेपडळ येथील रेल्वे गेटच्या जवळ घडली असून 29 वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार रिक्षा चालक अनिकेत रिशू कुमार (वय 24, शिवचैतन्यनगर, फुरसुंगी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिक्षा चालकानेच बलात्कार करण्याचा केला प्रयत्न : शहरात मोठ्या प्रमाणावर रिक्षा असून शहराच्या चारही बाजूला आपल्या रिक्षा थांबलेल्या पाहायला मिळतात. प्रवाश्यांना सेवा देण्यासाठी शहरात दारोरोज हजारो रिक्षाचालक हे रिक्षा चालवत असतात. अश्यातच पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या एका तरुणीवर रिक्षा चालकानेच बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे.

रिक्षा अंधाऱ्या ठिकाणी नेत बलात्काराचा प्रयत्न : तक्रारदार तरुणी ही एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. दररोजच्या प्रमाणे 20 जून रोजी काम संपवून ती घरी जाण्यासाठी आरोपीच्या रिक्षात बसली होती. त्यानंतर आरोपीने घरी जाण्यासाठी नेहमीच्या रस्त्याने रिक्षा न घेता वेगळ्या मार्गाने रिक्षा चालवत अंधाऱ्या ठिकाणी रिक्षा घेऊन गेला. त्यानंतर रस्त्याच्या कडेला रिक्षा थांबून या रिक्षा चालकाने तरुणीच्या तोंडावर हात ठेवून तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्याला विरोध केला असता अंगावर बसून अश्लील चाळे केले. या संपूर्ण प्रकारानंतर पीडितेने तात्काळ वानवडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दखल केली आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक कमी झाल्याची जनतेत चर्चा आहे.

हेही वाचा -

  1. Psychiatric Woman Rape Case: मनोरुग्ण महिलेवर ऑटोचालकाचा अत्याचार; विवस्त्र निर्वस्त्र सोडून झाला होता, अखेर अटक
  2. Missing Girls Statistics Pune: धक्कादायक! पुण्यात बेपत्ता मुलींच्या आणि बलात्काराच्या घटनेत वाढ
  3. Mangesh Satamkar Grants Relief: युवती सेना महिला पदाधिकाऱ्यावर बलात्कार प्रकरण; ठाकरे गटाचे नगरसेवक मंगेश सातमकर यांना न्यायालयाचा दिलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.