पुणे - जामगावच्या उपसरपंचावर राजीनामा देण्यासाठी चार अज्ञातांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात उपसरपंच विनोद सुर्वेवर यांच्या गाडीची तोडफोड केली असून याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
नीलेश सूर्वे, योगेश ठोंबरे यांच्या नादी लागतो का म्हणत विनोद सुर्वे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. आरोपींकडून त्यांना धमकी देण्यात आली होती. उपसरपंच पदाचा राजीनामा देण्यासाठी हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. अज्ञात आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. यातील आरोपी फरार झाले आहे. दरम्यान विनोद सुर्वेवर उपचार सुरू आहे. योगेश ठोंबरे हे कात्रज दुध संघाचे संचालक रामभाऊ ठोंबरे याचा पुतणे असल्याची माहिती आहे.
हेही वाचा - Fake baba : भोंदूबाबाने करणीची बाधा काढण्याच्या नावाखाली घातला ३२ लाखांचा गंडा