ETV Bharat / state

Pune Crime News : येरवडा कारागृहात आरोपी नाना गायकवाडवर सपासप वार - सुरेश बळीराम दयाळू

येरवडा कारागृहातील श्रीमंत कैदी म्हणून ओळखले जाणारे नाना गायकवाड यांना याच्यावर वार करण्यात आला आहे. सुरेश बळीराम दयाळू असे आरोपी कैद्याचे नाव आहे. त्याने लोखंडी पत्र्याच्या सहाय्याने नाना गायकवाड यांच्यावर सपासप वार केले. याप्रकरणी सुभाष मानसिंग दरेकर वय 54 वर्ष, पोलीस जेल वॉर्डन येरवडा यांनी फिर्याद दिली आहे.

Pune Crime News
Pune Crime News
author img

By

Published : Feb 3, 2023, 9:14 PM IST

पुणे : पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात काही दिवसांपूर्वी जुने कैदी आणि नवीन कैदी यांच्यात दगडफेकीची घटना ताजी असतानाच, आज येरवडा कारागृहातील नाना गायकवाड याच्यावर वार करण्यात आले आहे. सुरेश बळीराम दयाळू असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सुभाष मानसिंग दरेकर (वय 54 वर्ष) यांनी येरवडा मध्यवर्ती कारागृह यांनी फिर्याद दिली आहे.

लोखंडी पत्र्याने केला वार : दोघांत कशावरुन वाद झाला हे समजू शकले नाही. उद्याेजक नाना गायकवाड यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. मोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. बंदी सुरेश बळीराम दयाळु याने कोणतेही कारण नसताना लोखंडी पत्र्याचे तुकडयाने नानासाहेब शंकरराव गायकवाड हल्ला केला आहे. सुरेश बळीराम दयाळु यांच्याविरुध्द भा.द.वि. कलम ३२४ प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मोकाअंतर्गत कारवाई : नाना गायकवाड यांच्यावर पत्नीला शाररिक, मानसिक त्रास देणे, जमीन बळकावणे आदि गुन्हात त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. गायकवाड यांच्यावर विविध गुन्ह्यात पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोकाअंतर्गत कारवाई केली होती. तसेच त्यांच्यावर बेकायदेशीस संपत्ती बाळगण्याचा आरोप आहे.

जेलमधुन हलवण्याची मागणी : नाना गायकवाड यांना येरवडा जेलमधुन दुसरीकडे हलविण्यासाठी या आधीच पुणे पोलिसांकडून अर्ज करण्यात आला होता. जेलमध्ये बसून सोशल मीडियाचा वापरकरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्या प्रकरणी चतुःशृंगी पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील फीर्यादीने तक्रार अर्ज केला होता. तसेच त्याच्यावर विविध मार्गांनी दबाव टाकत होता.

हेही वाचा - Mumbai Crime : धार्मिक स्थळांवर खोट्या नाण्यांच्या बदल्यात खऱ्या पैशांचा खेळ; आरोपीला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.