ETV Bharat / state

'कुस्तीसाठी बापाने जमीन विकली', पोराने बापाच्या मातीचे सोने करत 'महाराष्ट्र केसरीत सुवर्ण जिंकले' - तिसऱ्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले

बीडच्या अतिष तोडकर २१ वर्षाच्या कुस्ती पटू अतिषने सुवर्ण पदकापर्यंत मजल मारली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अतिष तोडकर सुवर्णपदक जिंकले. त्यासाठी त्याच्या वडीलांनी 5 एकर जमीन विकली होती. आज त्याचे फळ म्हणून महाराष्ट्र केसरीत सुवर्ण जिंकले आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jan 14, 2023, 11:09 AM IST

पोराने बापाच्या मातीचे सोने केले

पुणे : 65व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गादी विभागातील 57 किलो वजनी गटात बीडच्या अतिष तोडकरने सुवर्णपदक जिंकले आहे. अवघ्या २१ वर्षाच्या अतिषने सुवर्ण पदकापर्यंत मजल मारली. पण अतिषचा इथपर्यंतच हा प्रवास अतिशय खडतर आहे. त्याच्या या यशात सगळ्यात महत्त्वाचे त्याच्या वडिलांचे योगदान आहे. कारण त्याच्या वडिलांनी उपजीविका भागवनारी जमीन पोराच्या कुस्तीसाठी विकली आहे.

5 एकर जमीन विकून पोराचा खर्च पूर्ण : सुनील तोडकर हे देखील कसलेले पैलवान आहेत. मुलाने मोठे पैलवान व्हावे देशासाठी ऑलम्पिक खेळून पदक मिळवावे असे त्यांचे स्वप्न आहे. अतिषने वयाच्या बाराव्या वर्षीच कुस्तीला सुरवात केली. पोराचे कुस्ती वेड पाहून स्वतः पैलवान असलेल्या सुनील तोडकर यांनी दिनेश गुंड यांच्या जोग महाराज व्यायाम शाळेत दाखल केल. पोरगं चांगल्या कुस्त्या मारायला लागलं. बापाची छाती अभिमानाने फुगत होती. पण खिसा रिकामा होता. पोराची कुस्ती थांबता कामा नये असा ध्यास सुनील तोडकर यांनी केला होता. पैसे नाही मुलाचा खर्च करायचा कसा ? अखेर काळजावर दगड ठेवला आणि जीवापाड प्रेम असणारी वडिलोपार्जित आपली 5 एकर जमीन विकली. दुष्काळी आष्टी तालुक्यात मंगळूर गावात जिरायत 9 एकर जमीन आहे. त्यापैकी 5 एकर जमीन विकून पोराचा खर्च पूर्ण केला.

मुलासाठी जमीन विकली : ज्यावेळी जमीन विकली आणि कुस्तीसाठी गावातले लोक सुद्धा नाव ठेवायचे परंतु माझे स्वप्न होते माझ्या मुलाने ऑलम्पिक खेळावे मोठे पैलवान व्हावे. माझी जमीन विकली, परंतु मला त्याबद्दल थोडी सुद्धा खंत नाही. कारण माझ्या जमीन विकलेल्या कामाचे माझ्या मुलाने सोने केले. आज मी अभिमानाने त्याचे मेडल आणि प्रमाणपत्र बघून सोण्यासारखे जीवन जगत असल्याचे अतिषचे वडील सांगतात.

तिसऱ्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले : अतिष तोडकरची ही तिसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे. पहिल्या स्पर्धेत कांस्य दुसऱ्या स्पर्धेत रोप्य आणि आता तिसऱ्या स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले आहे. तो आतापर्यंत 16 राष्ट्रीय स्पर्धा खेळला व त्यात तीन सुवर्णसह आठ पदक त्याने जिंकले. आतिष आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या मल्लांनाही हरवायला लागला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय व ऑलम्पिक स्पर्धा खेळण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. माझ्या अतिशने एक दिवस ऑलिंपिक खेळून देशासाठी सुवर्णपदक जिंकावे अशी आता व्यक्त करताना सुनील तोडकर यांच्या डोळ्यासमोर सर्व संघर्ष जात असताना त्यांचा कंठ दाटून आला होता.

वडिलांचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवले : दुष्काळी बीड जिल्ह्यातून कसदार पैलवान घडवण्यासाठी कसदार जमीन विकलेल्या बापाने आणि मुलाने कुस्ती मैदान गाजवत कुस्तीत सुवर्ण पदक जिंकून कुस्तीतली जमीन कसत वडिलांचे गावाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव गाजवत आहे. अशा खेळाडूंना प्रोत्साहन देणं ही सरकार बरोबर समाजाची सुद्धा देणं गरज आहे. हे ओळखलं सुद्धा गरजेचे आहे तरच कुस्ती होऊ मोठी होऊ शकते. वडिलांना अभिमान वाटावी अशीच गोष्ट या मुलाने केलेली आहे. त्याचबरोबर अशा मुलांसाठी सरकारने काहीतरी करणे आवश्यक आहे. मोठ्या गटातल्या कुस्ती खेळणाऱ्या खेळाडूंसाठी नाही तर लहान गटात खेळणाऱ्यांनाही मदत करणे गरजेचे असल्याचे आतिशचे प्रशिक्षक सांगतात. आजही आतिषला मदतीची गरज आहे. त्यामुळे पैसे नाहीत म्हणून गुणवत्ता लपवून ठेवण्यापेक्षा त्या गुणवत्तेला मदत करून देशाचा अभिमान जागा करणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा : Rapido Bike : रॅपिडोला उच्च न्यायालयाचा दणका; सेवा तात्काळ बंद करण्याचे निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.