ETV Bharat / state

देवस्थानाचे सोने कर्जरूपाने घेण्याची योजना अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरू केली; पृथ्वीराज चव्हाणांचा पलटवार

कोरोना विषाणुचा सामना करण्यासाठी सरकारने देशातील देवस्थानातील सोने कर्जरुपाने घ्यावे, असा सल्ला पृथ्वीराज चव्हाणांनी दिला होता. त्यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली आणि धार्मिक रंग दिला गेला. या टीकाकारांना पृथ्वीराज चव्हाणांनी उत्तर दिले आहे.

पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण
author img

By

Published : May 15, 2020, 1:48 PM IST

पुणे - कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने देशातील मंदिरांकडे असणारे 76 लाख कोटींचे सोने ताब्यात घ्यावे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. या मागणीनंतर चव्हाण यांच्यावर चहुबाजूंनी टीका होऊ लागली.

त्यावर पृथ्वीराज चव्हाणांनी टीकाकारांना उत्तर दिले असून देवस्थानाचे सोने कर्जरूपाने घेण्याची योजना अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरू केल्याचे सांगितले. इतकेच नाही तर आताच्या पंतप्रधानांच्या काळातही देशातील विविध मंदिरांचे साडेवीस टन सोने बँकांमध्ये जमा असल्याचे सांगितले. आतापर्यंत भारतातील दोन पंतप्रधानांनी देवस्थानचे सोने कर्जरूपाने घेण्याची प्रक्रिया राबवली असून हे दोघेही भाजपचे सदस्य असल्याचा टोला त्यांनी लगावला.

कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने धार्मिक संस्थांकडून परतीच्या बोलीवर कर्जरूपाने सोने घ्यावे, त्याबदल्यात 1 ते 2 टक्के व्याज देण्यात यावे, अशी सूचना मी केली होती. परंतु काही समाजविघातक व्यक्तींनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. खरे पाहता मी केलेली सूचना सरकारच्या योजनेचा एक भाग आहे. अशाप्रकारची योजना सर्वप्रथम अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरू केली होती. पोखरण अनुचाचणीच्या पार्श्वभूमीवर 14 सप्टेंबर 1999 साली गोल्ड डिपॉझिट स्कीम (जीडीएस) या नावाने सुरू केली होती. त्यानंतर 2015 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचे नाव बदलून गोल्ड मोनिटायझेशन स्कीम (जीएमएस 2015) योजना असे नाव ठेवले.

या योजनेच्या पहिल्याच वर्षात देशातील आठ मंदिरांनी त्यांचे सोने विविध बँकांत ठेवले. यामध्ये तिरुपती देवस्थानाचाही समावेश आहे. ही योजना सुरू झाल्यापासून म्हणजे 2015 पासून ते आतापर्यंत विविध बँकांत साडेविस टन सोने जमा झाले आहे. आपल्या देशात व्यवहारात नसलेले सोने खूप मोठ्या प्रमाणात आहे, असे जागतिक सुवर्ण परिषदेचा अहवाल सांगतो.

सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणुच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी देशातील सोन्याचे योग्य नियोजन आणि विनिमय करणे गरजेचे आहे, अशी सूचना मी मांडली होती. परंतु काही व्यक्तींनी मी एका विशिष्ट धर्माला लक्ष केले आहे, असा अप्रचार करीत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात मी योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहे. आतापर्यंत भारतात दोन पंतप्रधानांनी देवस्थानचे सोने कर्जरूपाने घेण्याची प्रक्रिया राबवली असून हे दोघेही भाजपचे सदस्य आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.