ETV Bharat / state

हजरत इमाम हुसैन यांच्या बलिदानाला उजाळा देण्यासाठी शिया मुस्लिम समाजाच्यावतीने भर पावसात मिरवणूक

author img

By

Published : Aug 10, 2022, 10:46 PM IST

पुण्यातील जुन्नर तालुक्यात शिया मुस्लिम बांधवांतर्फे हजरत इमाम हुसेन यांच्या बलिदानाला उजाळा देण्यासाठी भर पावसात मिरवणूक काढण्यात आली. ( Junnar In Pune District ) ( Hajrat Imam Husain ) ( sacrifice of Hazrat Imam Hussain )

Hazrat Imam Hussain Procession in pouring rain on behalf of Shia Muslim community
हजरत इमाम हुसैन यांच्या बलिदानाला उजाळा देण्यासाठी शिया मुस्लिम समाजाच्यावतीने भर पावसात मिरवणूक

पुणे मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसैन यांनी करबला येथे 1400 वर्षापूर्वी दिलेल्या थोर बलिदानाला उजाळा देण्यासाठी यौमे आशरच्या दिवशी शिया मुस्लिम समाजाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका येथे भर पावसात मिरवणूक काढून हजरत इमाम हुसैन यांना आदरांजली वाहण्यात आली. ( Junnar In Pune District ) ( Hajrat Imam Husain ) ( sacrifice of Hazrat Imam Hussain )

हजरत मोहम्मद पैगंबर यांचे जवाई हजरत आली यांचे पुत्र हजरत इमाम हुसैन हे मोहरम महिन्याच्या 10 तारखेला म्हणजेच रोजे आशुरला करबला येथे शहीद झाले. इराकची राजधानी असलेल्या बगदादमधील करबला या गावात 'तारीख-ए-इस्लाम'च ऐतिहासिक युद्ध झाल होते. हे युद्ध सत्य आणि असत्याची लढाई होती. त्याकाळी यजीद एक क्रूर शासक होता. त्याची प्रतिमा समाजात चांगली नव्हती. यजीदला इस्लाम धर्म हा मोहम्मद पैगंबर म्हणजेच अल्लाहच्या आदेशानुसार जो इस्लाम धर्म चालला होता. तो मान्य नव्हता. तो इस्लाममध्ये त्यांच्या आवडीनुसार नियम तयार करून तो म्हणेल तेच शासक असा इस्लाम धर्म त्याला बनवायचा होता. पण त्यावेळी मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसैन यांनी त्याला विरोध केला आणि त्यानंतर या क्रूर शासक यजिदने एक तर माझं शासन मान्य करा अन्यथा युद्ध करा अस फरमान काढल. तेव्हा हजरत हुसैन यांनी त्याचा तो फरमान रद्द करून युद्धाला तयार झाले.

आशुरा म्हणजे काय इस्लाम धर्माच्या पहिल्या महिन्यात मोहरमच्या 10 तारखेला (10 मुहर्रम 61 हिजरी, अर्थात 10 ऑक्टोबर,680 इ.स) मोहम्मद साहेब यांचे नातू हजरत हुसैन यांना करबला येथे यजीद बिन मुआविया यांच्या एक लाख साथीदारानी इमाम हुसैन यांच्या अनुयायींना 3 दिवस विनापाण्याच ठेवून शहीद केले. म्हणून या दिवशी 'यौमे आशुरा' म्हणून सर्वत्र दुःखद (शोक) केला जातो. इमाम हुसैन यांच्याबरोबर जे लोक होते त्यात महिला-पुरूष व मुलांचा समावेश होता. हजरत हुसैन यांच्या फौजेमध्ये अनेक लहान मुले होती. यावेळी इमाम हुसैन यांच्या बरोबर त्यांचं 6 महिन्यांचा बाळ अली असगर हे देखील होते आणि त्यावेळी तेदेखील 3 दिवस विनापाण्याचे होते. अशा परिस्थितीही ते युध्दास सामोरे गेले. अब्बास इब्ने अली हे हजरत हुसैन यांच्या सैन्याचे प्रमुख होते. शेवटच्या क्षणापर्यंत इमाम हुसैन यांनी आजोबा मोहम्मद पैगंबर यांची शिकवण आणि त्यांचा इस्लाम हाच खरा इस्लाम आहे, हे सांगितल. पण क्रूर याजिदच्या सैन्याने इमाम हुसैन यांची कोणतीही गोष्ट न ऐकता त्यांना शहीद केलं. याची आठवण म्हणून सर्वत्र मोहरम साजरा केला जातो.

ठिकठिकाणी काढले जातात जुलूस मोहरम हा आनंदाचा सण नसून दु:खाचा दिवस आहे. या महिन्यात इमाम हुसैन यांचे बलिदान उजागर केले जाते. शिया मुस्लिम समुदायातील लोक काळे कपडे घालून या बलिदानासाठी जुलूस काढतात. इमाम हुसैन यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देतात. भारतात ठिकठिकाणी आज जुलूस काढला जातो तेव्हा तेव्हा सर्वधर्मीय नागरिक या जुलूसचे स्वागत करून अलम ( पंजा ) आणि ताबूत घेऊन जे लोक उभे असतात त्यांच्या पायावर पाणी टाकून आदरांजली व्यक्त करतात. जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार करून मिरवणुकीला सुरवात झाली. यावेळी या मिरवणुकीत मोठ्या संख्येने अझादार म्हणजेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा : Hiv through tattoo - टॅटू बनवत असाल तर सावधान..! एचआयव्ही होऊ शकतो, अशी घ्या काळजी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.