पुणे - आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 724 वा संजीवन समाधी सोहळा साजरा होत आहे. हा सोहळा म्हणजे वारकऱ्यांसाठी एक सणच असतो. मात्र जगावर कोरोना महामारीचे संकट असल्याने यंदा हा सोहळा प्रत्येकाला अनुभवता येत नाही. वारकऱ्यांची हा सोहळा चुकला असला तरी, ज्या विषाणूमुळे हा सोहळा आज मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडत आहे. त्या सोहळ्या दरम्यान एका बाल गायिकेने जगावर आलेल्या कोरोना महामारीचे संकट लवकर दूर व्हावे, असे साकडे अभंगाच्या माध्यमातून माऊलींना घातले आहे. आश्विनी मिठे असे त्या बाल गायिकचे नाव आहे.
कोरोनाचे संकट दुरू होवो-
जगावर कोरोना महामारीचे संकट असताना माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आळंदीमध्ये परंपरेनुसार मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थित साजरा होत आहे. या सोहळ्याला वारकऱ्यांना व भाविकांना उपस्थित राहता आले नसले तरी वारकऱ्यांचा भक्तिभाव प्रत्येकाच्या मनामनात घराघरात रुजलेला आहे. हाच भक्तिभाव ठेवून प्रत्येकाने घरातूनच माऊलींची सेवा समर्पित करावी, असे आव्हान बाल गायिका अश्विनी मिठे हीने आज आळंदीतून केले आहे. तसेच आपल्या गोड वाणीतून अभंग गात कोरोनाचे संकट दूर होण्याची आणि गुण्यागोविंदाने आळंदीत होणारे सोहळे पुन्हा वारकऱ्यांच्या साक्षीने सुरू व्हावेत अशी प्रार्थना माऊलींच्या चरणी अश्विनी मिठी हिने केली आहे.