पुणे: अजित पवार म्हणाले की, जेव्हा आम्ही याची माहिती घेतली तेव्हा सौरव पिंपळकर या व्यक्तीच्या ट्विटर अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली आहे. तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचा त्यात उल्लेख आहे. तो खरेच भाजपचा कार्यकर्ता आहे की नाही, याबद्दल आम्हाला माहीत नाही. वैचारिक लढाई ही विचारांनी करूया. प्रत्येकाला व्यक्तिगत स्वातंत्र्य असून संविधानाने तो अधिकार दिला आहे; पण त्याचा गैरवापर कशाला करायचा? असे बदनामीकारक विधान करण्याचा अधिकार यांना कोणी दिला, असा सवाल यावेळी पवारांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे : अजित पवार पुढे म्हणाले की, यात राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालून याचे मास्टरमाईंड कोण आहे? त्याला कोणी हे करायला भाग पाडले? त्याचा मोबाईल घेऊन त्याचा कोणाकोणाशी संबंध आला आहे, हे कळले पाहिजे. प्रत्येकाने आपला पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावा; परंतु असे करताना कुठल्याही एखाद्या पक्षाच्या नेत्याबद्दल बदनामी करायची, त्यांचे चरित्र्यहनन करायचे हे अलीकडे वाढले आहे. त्याचा निषेध आणि धिक्कार आहे. पोलीस खात्याने कायदा सुव्यवस्था लक्षात घेत कठोर कारवाई करावी, असे देखील यावेळी पवार म्हणाले.
गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न : अलीकडे सोशल मीडियावर जाणीवपूर्वक काहींना बदनाम करण्याचे काम केले जात आहे. काही पक्षांबद्दल जाणीपूर्वक गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. छत्रपती संभाजीनगरला औरंगाबादच म्हणणार अशी चुकीची बातमी एका चॅनलने दाखवली. शरद पवार राजकारणात काम करून अनेकवर्षे झाली. मग ते असे कसे बोलू शकतात. कारण नसताना चुकीच्या बातम्या दाखवल्या गेल्या. महाराष्ट्राची एक संस्कृती आहे; पण आज गलिच्छपणे काहीजण वक्तव्य करत आहेत. याबाबत त्या त्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले पाहिजे. पुढे असेच होत राहील तर ते आपल्या राज्याची बदनामी करणारे होईल. तसेच आज जे राज्यात चित्र निर्माण झाला आहे याबाबत सरकारने कडक कायदा करावा असे यावेळी अजित पवार म्हणाले.
हेही वाचा:
- Lok Sabha 2024 : लोकसभा २०२४ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने बोलावली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक
- Nitesh Rane criticizes Sanjay Raut: संजय राऊत क्रांतिवीर नाही, त्यांनी मराठी लोकांची घरे लुटली- नितेश राणेंची टिका
- Sanjay Raut Reaction on Death Threat: आमच्या जीवाचे बरेवाईट व्हावे, हीच सरकारची इच्छा-संजय राऊत