ETV Bharat / state

पुण्यातील एआरडीई आणि भारतफोर्जला लष्कर प्रमुखांनी दिली भेट

author img

By

Published : Jan 9, 2021, 9:45 PM IST

संरक्षणक्षेत्रातील संशोधन आणि विकासाचा आढावा घेण्यासाठी लष्कर प्रमुख जनरल एम.एम नरवणे यांनी आज पुण्यातील भारत फोर्ज आणि एआरडीई या संस्थांना भेट घेतली. यावेळी लष्कर प्रमुखांना संरक्षणविषयक सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती देण्यात आली.

General MM Narwane news
लष्कर प्रमुख एम.एम नरवणे बातमी

पुणे - संरक्षणक्षेत्रातील संशोधन आणि विकासाचा आढावा घेण्यासाठी लष्कर प्रमुख जनरल एम.एम नरवणे यांनी आज पुण्यातील भारत फोर्ज आणि एआरडीई या संस्थांना भेट घेतली. यावेळी लष्कर प्रमुखांना संरक्षणविषयक सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती देण्यात आली.

हेही वाचा - रात्रभर बरसलेल्या पावसाने द्राक्षांसह पालेभाज्या व कांद्याची मोठी नासाडी

एरोस्पेस मॅन्युफॅक्च्युरिंग फॅक्ट्री, अल्ट्रा लाईट हॉवित्झर्स, संरक्षित वाहने, लहान शस्त्रे आणि दारूगोळा आदी प्रकल्पांचा यात समावेश आहे. लष्कर प्रमुखांनी कल्याणी सेंटर ऑफ टेक्निकल अँड मॅन्युफॅक्च्युरिंग इनोव्हेशनलाही भेट दिली. तेथे त्यांना थ्रीडी प्रिंटिंग, मानवरहित ग्राउंड व्हेइकल्स, नॅनो टेक्नॉलॉजी, एआय, थर्मल इमेजिंग इत्यादींची माहिती देण्यात आली.

आरमामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टाब्लिशमेंट अर्थात (एआरडीई) ही संरक्षण संशोधन विकास संघटनेची प्रमुख संस्था असून, ती सैन्य दलाला जागतिक स्तरावरील शस्त्रास्त्र यंत्रणेचा पुरवठा करण्याचे काम करते. एआरडीईच्या भेटीदरम्यान लष्करप्रमुखांना एआरडीईने विकसित केलेली उपकरणे व दारूगोळा यांच्या प्रयोगात घेण्यात आलेल्या विविध चाचण्यांवरील संशोधन व प्रगती आणि नवीन उपक्रमांविषयी माहिती देण्यात आली. यामध्ये एटीएजीएस, पिनाका, 10 मीटर फोल्डेबल ब्रिज, लेझर गाईडेड अँटी-टँक गाईडेड मिसाईल सिस्टम यांचा समावेश होता. जनरल एम.एम. नरवणे यांची ही भेट केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या अनुषंगाने सशस्त्र सैन्याला स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.

हेही वाचा - इंदापुरात आजी-माजी मंत्री आमने-सामने; ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार लक्षवेधी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.