ETV Bharat / state

#COVID 19 : हुतात्मा राजगुरूंच्या जन्मस्थळावर न येण्याचे आवाहन

आज हुतात्मा दिवस म्हणजेच महाराष्ट्राचे क्रांतीकारी शिवराम हरी राजगुरू तसेच भगतसिंह व सुखदेव यांचा बलिदान दिवस. या निमित्त राजगुरू यांच्या जन्मस्थळ असलेल्या राजगुरुनगर येथील राजगुरू वाडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. पण, आज कोरोनामुळे या ठिकाणी येऊ नये, असे आवाहन स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख यांनी केले आहे.

संपादीत छायाचित्र
संपादीत छायाचित्र
author img

By

Published : Mar 23, 2020, 2:32 PM IST

पुणे - क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा आज (दि. 23 मार्च) 89 वा बलिदान दिवस आहे. राजगुरूंचे जन्मस्थळ असलेल्या राजगुरुनगर येथे आज प्राथमिक स्वरूपात साजरा करण्यात आला. सध्या देशावर कोरोनाचे मोठे संकट उभे असल्याने सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा बलिदान दिवस प्राथमिक स्वरुपात साजरा करून नागरिकांनी जन्मस्थळावर गर्दी करून येऊ नये, असे आव्हान स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख यांनी केले.

हुतात्मा राजगुरूंच्या जन्मस्थाळावर न येण्याचे आवाहन

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांचा आज 89 वा बलिदान दिवस म्हणून साजरा केला जात आहे. मात्र, देशावर कोरोनाचे मोठे संकट उभे राहिले आहे. या संकटावर मात करण्यासाठी लढा सुरू आहे. त्यामुळे या क्रांतिकारकांच्या बलिदान दिनी देशभक्त, नागरिकांनी व राजगुरुनगर वासियांनी राजगुरुनगर येथील राजगुरू वाड्यावर गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासन व स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा - पुण्यात शाळा बंद! विद्यार्थ्यांचे शिक्षण मात्र ऑनलाईन सुरू, ज्ञान प्रबोधिनीचा उपक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.