ETV Bharat / state

कोरेगाव भिमा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम संयमाने साजरा करण्याचे आवाहन - कोरेगाव भिमा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम न्यूज

कोरेगाव भिमा येथे १ जानेवारी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम साजरा होणार आहे. मात्र, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी कार्यक्रमास गर्दी करू नये. तसेच, विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम साजरा करीत असतांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे कोरेगाव भिमा न्यूज
पुणे कोरेगाव भिमा न्यूज
author img

By

Published : Dec 12, 2020, 5:58 PM IST

कोरेगाव भिमा (पुणे) - कोरेगाव भिमा येथे १ जानेवारी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम साजरा होत असताना यावर्षी कोरोना महामारीच्या संकटाचे परिणाम विचारात घेऊन हा कार्यक्रम प्रतिकात्मक स्वरूपात शांततेने व संयमाने साजरा कण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची नियोजन आढावा बैठक आज जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभाजवळ घेण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, विवेक पाटील, उप विभागीय अधिकारी सचिन बारावकर, तहसीलदार सुनील कोळी, लैला शेख तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा - 'शरद पवार दोन वेळा पंतप्रधान होताना राहिले, पण तो दिवस पुन्हा येईल'

शौर्यदिनाचा कार्यक्रम शांततेने आणि सुरळीत पार पडणार

आपल्या राज्यासह देश आणि जग कोरोनाविरुद्ध लढत आहे. कोरोना विषाणूवर अद्यापपर्यंत लस आलेली नाही. तसेच, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी कार्यक्रमास गर्दी करू नये. अशा परिस्थितीत योग्य पध्दतीने अभिवादन कार्यक्रम साजरा करत असतांना आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे. हा कार्यक्रम शांततेने आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले. बैठकीपूर्वी विजयस्तंभास जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी अभिवादन केले.

गर्दी न करण्याचे पोलिसांचे आवाहन

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम साजरा करीत असतांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना नागरिकांनी सहकार्य करावे. कोरोना संकट लक्षात घेऊन यावर्षी सर्व सण-समारंभ साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमात गर्दी होऊन कोरोनाचा समूह-संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घेत कार्यक्रम साजरा करुया, असे आवाहनही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले.

हेही वाचा - पवार साहेबांचे वय मोजू नये, सगळे तरुण त्यांच्या पुढे फिके पडतील - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.