ETV Bharat / state

B.A. Patients In Pune : चिंता वाढली पुण्यात ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटचे 7 रुग्ण

author img

By

Published : May 28, 2022, 8:59 PM IST

राज्यात चिंताजनक बातमी समोर आली आहे. पुण्यात आज कोरोनाच्या ओमिक्रॉनच्या नव्या बीए ४ आणि बीए ५ या व्हेरिएंटचे तब्बल ७ रुग्ण ( 7 patients of new variant of Omicron in Pune) सापडल्याने खळबळ माजली आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली (Anxiety increased) आहे. विशेष म्हणजे हे व्हेरिएंट सापडलेल्या रुग्णांत ९ वर्षाचा चिमुकला सोडता सर्वांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.

new variant of Omicron
ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंटचे

पुणे / मुंबई : ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट (New variant of Omicron) बीए ४ आणि बीए ५ चे एकूण सात रुग्ण पुण्यात सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा पुन्हा अलर्टवर (Alert on health system) आहे. पुण्यात ओमायक्रॉनच्या २ नव्या सब व्हेरिएंट म्हणजेच बीए ४ चे ४ तर बीए ५ चे ३ रुग्ण सापडले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे हे व्हेरियंट जास्त संसर्गजन्य असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व रुग्ण पुणे शहरातील आहेत आणि ४ ते १८ मे २०२२ या कालावधीतील आहेत.

या रुग्णांत ४ पुरुष तर ३ महिला आहेत. यातील ४ जण ५० वर्षांवरील आहेत तर २ जण २० ते ४० वर्षे या वयोगटातील आहेत. तर एकजण १० वर्षांखालील आहे. यातील दोन रुग्णांचा दक्षिण आफ्रिका, बेल्जियम प्रवासाचा इतिहास आहे तर तर ३ जणांनी भारतात केरळ आणि कर्नाटक राज्यात प्रवास केला आहे. दोन रुग्णांचा कोणताही प्रवासाचा इतिहास नाही. यातील ९ वर्षाचा एक मुलगा वगळता सर्वानी कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.तर एकाने बूस्टर देखील घेतलेला आहे.

यातील सर्वांना कोविडची सौम्य लक्षणे होती. कोणालाही रुग्णालयात भरती करण्याची गरज भासलेली नाही. प्रत्येकाला घरगुती विलगीकरणात उपचार देण्यात आले. आता हे सर्व रुग्ण बरे झाले आहेत. बी. ए. ४ आणि ५ हे ओमायक्रॉन वंशावळीतील असून त्यामुळे विषाणू प्रसाराचा वेग काहीसा वाढतो असे आंतरराष्ट्रीय अनुभवावरुन लक्षात आले आहे असे तज्ञांचे मत आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण आटोक्यात आल्यानंतर राज्य सरकारने पूर्णपणे निर्बंध हटवले आहेत. राज्यातील सर्व व्यवहार सुरळीत असताना मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्याच्या काही भागात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यात आता बीए च्या नव्या व्हेरियंटने शिरकाव केल्याने चिंतेत भर पडली आहे. बीए ४ चे चार आणि बीए ५ च्या तीन रुग्णांची नोंद झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. त्यामुळे नव्या व्हेरियंट धोका वाढला असून आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

पुण्यातील बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वयाने सुरू असलेल्या जनुकीय क्रमनिर्धारण सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार पुणे शहरात बीए ४ चे चार आणि बीए ५ व्हेरियंटचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) केलेल्या जनुकीय तपासणीत हे नवे व्हेरियंट दिसून आले आहेत. इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटरनेही याला दुजोरा दिला आहे.

हेही वाचा : Mumbai Corona Update : मुंबईत प्रसार वाढतोय पुन्हा 300 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.