ETV Bharat / state

बारामती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या सोडती जाहीर

बारामती तालुक्यात आगामी काळात होऊ पाहणाऱ्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी २८ गावांसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी सरपंचपद राखीव ठेवण्यात आले आहे.

Baramati
Baramati
author img

By

Published : Dec 9, 2020, 12:32 PM IST

बारामती - बारामती तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंचपदाच्या आरक्षण सोडती जाहीर झाल्या आहेत. येथील कवी मोरोपंत सभागृहात या सोडती जाहीर झाल्या. त्यानंतर तालुक्यातील इच्छुक उमेदवारांमध्ये काही ठिकाणी आनंद तर काही ठिकाणी नाराजी झाल्याचे दिसून आले आहे. बारामती तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी जुन्यासह नवखे चेहरे कमालीचे उत्सुक होते. मात्र त्या भागात वेगळ्याच प्रवर्गाचे आरक्षण पडल्याने इच्छुकांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले. तर काहींचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून आला.

२८ ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी सरपंचपद राखीव

बारामती तालुक्यात आगामी काळात होऊ पाहणाऱ्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी २८ गावांसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी सरपंचपद राखीव ठेवण्यात आले आहे. यामध्ये भोंडवेवाडी, शिर्सुफळ, पानसरेवाडी, मगरवाडी, आंबी बुद्रुक, पवईमाळ, करंजेपुल, गाडीखेल, पळशीवाडी, मोरगाव, कुरणेवाडी, सोनकसवाडी, मोराळवाडी, माळेगाव बुद्रुक, माळवाडी लोणी, खांडज, सदोबाचीवाडी, माळवाडी, लाटे, उंडवडी क प., वाणेवाडी, देऊळगाव रसाळ, चोपडज, आंबी खुर्द, अंजनगाव, जळगाव सुपे, काळखैरेवाडी, उंडवडी सुपे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

या ग्रामपंचायतींसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील असणार सरपंच

यामध्ये बऱ्हाणपूर, ढाकाळे, मोढवे, दंडवाडी, माळेगाव खुर्द, घाडगेवाडी, खंडोबाचीवाडी, मेखळी, सांगवी, शिरष्णे, तरडोली, वढाणे, झारगडवाडी, पाहुणेवाडी, जळगाव कप, मासाळवाडी चौधरवाडी वाघळवाडी, मानपा वस्ती मेडद, सायंबाचीवाडी, सुपा, जराडवाडी, चांदगुडेवाडी, सोनवडी सुपे, कोऱ्हाळे बुद्रुक, जोगवडी, लाटे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

इतर मागास प्रवर्गातील सरपंचपद

थोपटेवाडी, सस्तेवाडी, मुरूम, बाबुर्डी, वंजारवाडी, नारोळी, धुमाळवाडी, जैनकवाडी, सोरटेवाडी, वडगाव निंबाळकर, होळ, कऱ्हावागज, कांबळेश्वर यांचा समावेश आहे.

इतर मागास प्रवर्गातील महिला सरपंच

खराडेवाडी, डोर्लेवाडी, ढेकळवाडी, साबळेवाडी, वाकी, गडदरवाडी, पिंपळी, सावळ, लोणी भापकर, पारवडी, कुतवळवाडी, कारखेल, काऱ्हाटी यांचा समावेश आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गातील सरपंच

मुढाळे, करंजे, कटफळ, निंबोडी, शिरवली, पणदरे, मळद यांचा समावेश आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला सरपंच

काटेवाडी, कन्हेरी, भिलारवाडी, निरावागज, कोऱ्हाळे खुर्द, गुणवडी, कोळवली, गोजुबावी यांचा समावेश आहे.

बारामती तालुक्यातील निंबुत या ग्रामपंचायतीत अनुसूचित-जमातीतील महिला वर्गासाठी राखीव असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.