ETV Bharat / state

पुणेकरांची बातच न्यारी, कुत्र्यांना अभ्यंगस्नानासह दिवाळी पहाटदेखील मिळणार - कुत्र्यांना अभ्यंगस्नान

दिवाळीच्या दिवसात अभ्यंगस्नानाला विशेष महत्व ( Abhangya bath for Dog ) असते. यावर्षी पुणेकर कुत्र्यांनादेखील अभ्यंगस्नान घालणार आहेत. कुत्र्यांसाठीही दिवाळी पहाटचे आयोजन केले आहे. त्यांच्या या आयडियाला प्राणीप्रेमी पुणेकर चांगला प्रतिसाददेखील देताना दिसत आहेत. उठा उठा दिवाळी आली भू-भू स्नानाची वेळ झाली, असे म्हणत यंदा काही प्राणीप्रेमी पुणेकर दिवाळी साजरी करणार आहे.

iwali celebration with Dog in Pune
कुत्र्यांना अभ्यंगस्नानासह दिवाळी पहाटदेखील मिळणार
author img

By

Published : Oct 24, 2022, 6:51 AM IST

पुणे: पुणेकरांच्या कल्पनाशक्तीला सगळेच दाद देतात. पुणेकर कधी कुत्र्यांचा वाढदिवस साजरा करतील, कधी वेगवेगळे आंदोलनं करतील, मांजरीचा वाढदिवस करतील तर कधी वेगवेगळ्या ठिकाणी टोमण्यांच्या पाट्या लावतील. यंदा मात्र पुणेकरांनी प्राणी प्रेमींसाठी भन्नाट ( unique Diwali celebration with Dog in Pune ) आयडिया केली आहे.

दिवाळीच्या दिवसात अभ्यंगस्नानाला विशेष महत्व ( Abhangya bath for Dog ) असते. यावर्षी पुणेकर कुत्र्यांनादेखील अभ्यंगस्नान घालणार आहेत. कुत्र्यांसाठीही दिवाळी पहाटचे आयोजन केले आहे. त्यांच्या या आयडियाला प्राणीप्रेमी पुणेकर चांगला प्रतिसाददेखील देताना दिसत आहेत. उठा उठा दिवाळी आली भू-भू स्नानाची वेळ झाली, असे म्हणत यंदा काही प्राणीप्रेमी पुणेकर दिवाळी साजरी करणार आहे. पुण्यात अनेक प्राणीप्रेमी आहेतच त्यात वेगवेगळ्या जातीची कुत्री पाळणे हा अनेक पुणेकरांचा आवडता छंद आहे. त्यामुळे यंदा पुणेकर कुत्र्यांनादेखील अभ्यंगस्नान घालणार आहे. शिवाय त्यांच्यासोबत दिवाळी पहा देखील साजरी करणार आहेत.

कुत्र्यांच्या अभ्यंगस्नानाचं आणि दिवाळी पहाटेचे आयोजन- पुण्यातील टेल्स ऑफ द सिटी हे कुत्र्यांसाठीचे कोथरुडमधील ग्रुमिंग आणि केअर सेंटर ( dogs grooming center ) आहे. या ठिकाणी कुत्र्यांना वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण दिले जाते. पोहणे, खेळणे शिवाय त्यांच्या आरोग्याचीदेखील काळजी घेतली जाते. प्राणीप्रेमी मागील काही वर्षांपासून या ठिकाणी आपल्या घरातील महत्वाचा सदस्य मानत असलेल्या कुत्र्यांना घेऊन येतात. त्यांच्याशी खेळतात. त्यांना पोहणे शिकवतात. याच ठिकाणी यंदा दिवाळीच्या पाच दिवसात कुत्र्यांच्या अभ्यंगस्नानाचं आणि दिवाळी पहाटेचे आयोजन केले आहे.

कुत्र्याची मसाज केली जाणार- बाजारात कुत्र्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. त्यात शॅम्पू, साबण, खेळणी, मसाज तेल, मसाज पॅक यांचा यात समावेश आहे. दिवाळीच्या निमित्ताने ज्या प्रकारे आपण उटणे लावून अंघोळ करतो. त्याच प्रकारे वेगवेगळ्या तेलाने कुत्र्याची मसाज केली जाणार आहे. त्यानंतर त्याला मसाज पॅक लावण्यात येणार. त्यांची आंघोळ करण्यात येणार आहे. यात दिवसात घरातील सदस्यांप्रमाणे कुत्र्यांनादेखील सजवण्यात येणार आहे.

आम्ही अभ्यंगस्नानाचा प्रयोग करणार टेल्स ऑफ द सिटीच्या प्रशिक्षक आभा भोसेकर यांनी सांगितले, की पुण्यात भरपूर प्रमाणात प्राणीप्रेमी आहे. यंदा प्राणीप्रेमी पुणेकरांसाठी आम्ही अभ्यंगस्नानाचा प्रयोग करणार आहोत. यासाठी आम्हाला चांगला प्रतिसाद देखील मिळतो आहे. दरवेळी आमच्याकडे कुत्र्यांना वेगवेगळं शिक्षण दिलं जाते. ग्रुमिंग केलं जातं. मात्र यावर्षी आम्ही प्राणी प्रेमी पुणेकर आणि त्यांच्या कुत्र्यांबरोबर स्पेशल दिवाळी साजरी करणार आहोत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.