ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक 2019 : पुण्यातील नाराज शिवसैनिक मातौश्रीवर... सध्या आठही मतदारसंघ भाजपकडे

पुणे शहरामध्ये शिवसेना टिकवायची असेल तर शिवसेनेला दोन जागा मिळाल्या पाहिजे, अशी मागणी घेऊन  शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी इच्छुक उमेदवार हे आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी मंगळवारी मातोश्रीवर गेले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपले म्हणणे हे सर्वजण मांडणार आहेत. शहरातील 8 विधानसभा मतदारसंघांमध्ये आठही ठिकाणी विद्यमान आमदार हे भाजपचे आहेत. यामुळे या आठही जागा पुन्हा भाजपकडे जाणार असल्याची चर्चा आहे.

विधानसभा निवडणूक 2019 : पुण्यातील नाराज शिवसैनिक मातौश्रीवर...
author img

By

Published : Oct 1, 2019, 1:18 PM IST

पुणे - शहरामध्ये शिवसेना टिकवायची असेल तर शिवसेनेला दोन जागा मिळाल्या पाहिजे, अशी मागणी घेऊन शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी इच्छुक उमेदवार हे आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी मंगळवारी मातोश्रीवर गेले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपले म्हणणे हे सर्वजण मांडणार आहेत. शहरातील 8 विधानसभा मतदारसंघांमध्ये आठही ठिकाणी विद्यमान आमदार हे भाजपचे आहेत. यामुळे या आठही जागा पुन्हा भाजपकडे जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुण्यातील शिवसेना पदाधिकारी हतबल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

हेही वाचा - मंत्रिपद देणार तिकडूनच लढणार; अनिल गोटेंचा सेना प्रवेशाचाही संकेत

पुण्यातील 8 विधानसभा मतदारसंघापैकी किमान 2 मतदारसंघ शिवसेनेला युतीत मिळतील, अशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यास एकही जागा पदरात पडत नसल्यामुळे शिवसेनेतील इच्छुक बंडखोरीच्या तयारीत आहेत.

हेही वाचा - कट्टर राणे समर्थक सतीश सावंतांचा 'स्वाभिमान'ला रामराम; राणेंना 'होमपीच'वर धक्का!

शिवसेनेला जर एकही जागा मिळाली नाही तर शहरात शिवसेना उरणार नाही, अशी भीती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, 8 पैकी एकही मतदारसंघ मिळत नसल्याने हडपसर विधानसभा मतदार संघातून बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत. तर काही नगरसेवक हे अपक्ष उमेदवारी दाखल करू शकतात, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. एकंदरीतच युती झाल्यानंतर शिवसेना पुणे शहरात मात्र हवालदिल झाल्याचे चित्र तयार झाले आहे.

Intro:पुण्यात शिवसेना हतबल पदाधिकारी मातोश्रीवरBody:mh_pun_02_shivsena_pune_issue_pkg_7201348

Anchor
पुणे शहरातल्या आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये आठही ठिकाणी विद्यमान आमदार हे भाजपचे असल्याने या आठही जागा पुन्हा भाजप कडे जाणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे पुण्यातील शिवसेना हतबल झाल्याचे चित्र दिसून येते पुण्यातील आठ विधानसभा पैकी किमान दोन विधानसभा शिवसेनेला युतीत मिळतील अशी अपेक्षा असलेल्या शिवसेनेच्या या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यास एकही जागा पदरात पडत नसल्यामुळे शिवसेनेतील इच्छुक बंडखोरीच्या तयारीत आहेत शहरांमध्ये शिवसेना टिकवायची असेल तर शिवसेनेला दोन जागा मिळाल्या पाहिजे अशी मागणी करण्यासाठी आता शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह ह् नगरसेवक पदाधिकारी इच्छुक उमेदवार हे आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी मंगळवारी मातोश्रीवर गेले आहेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपलं म्हणन हे सर्वजण मांडणार असून शिवसेनेला जर एकही जागा मिळाली नाही तर शहरात शिवसेना उरणार नाही अशी भीती या या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जाते दरम्यान आठ पैकी एकही मतदारसंघ मिळत नसल्याने हडपसर विधानसभा मतदार संघातून बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत तर काही नगरसेवक हे अपक्ष उमेदवारी दाखल करू शकतात एकंदरीतच युती झाल्यानंतर शिवसेना पुणे शहरात मात्र हवालदिल झाल्याचे चित्र आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.