पुणे : प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांनी पुत्र प्राप्तीबद्दल वक्तव्य केले होते. सम आणि विषम तारखेला स्त्रीशी संग केला; तर अनुक्रमे मुलगा व मुलगी होते, असे अशास्त्रीय व बेकायदेशीर वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी संगमनेर, शेलद (ता. अकोले), उरण (जि. रायगड), बीड या ठिकाणी जाहीरपणे केले होते. त्यासंबंधीचे व्हिडिओ युट्युबवर अपलोड केले गेले होते. सदर आक्षेपार्ह वक्तव्यामुळे झालेल्या महिलांच्या मानहानीबाबत आणि गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्याच्याउल्लंघनाबाबत महा. अंनिसने अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सकांकडे १७ फेब्रुवारी २०२० रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता.
इंदुरीकर महाराजांवर गुन्हा : महा. अंनिसच्यावतीने पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, याविषयी आग्रही भूमिका घेण्यात आली. त्यावेळी समाजातील काही हितसंबंधी आणि जातीयवादी लोकांकडून, संस्था-संघटनांकडून महा. अंनिसवर दबाव आणण्याचे व धमकवण्याचे प्रयत्न केले गेले. मात्र अशा कुठल्याही दबावाला व धमकीला न जुमानता महा. अंनिसच्यावतीने रंजना गवांदे, कॉम्रेड बाबा अरगडे, अविनाश पाटील यांनी इंदोरीकर महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा केला गेला होता.
सामाजिक स्वास्थ्यासाठी लढा : इंदुरीकर महाराज हे उच्च न्यायालयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या खटल्यासंबंधी अंनिसला न डावलता त्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सावधानपत्र दाखल करण्यात येत आहे. या सगळ्या प्रकारांमध्ये शासकीय यंत्रणा आणि राजकारणी दबाव निर्माण करत होते. त्या सर्वांना सुधारून आम्ही हा लढा लढत आहोत. सामाजिक स्वास्थ्यासाठी इंदुरीकर महाराज यांना शिक्षा होणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही हे करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितलेला आहे.
हेही वाचा :
- Indorikar Maharaj News : इंदुरीकर महाराजांना माध्यमांची धास्ती, कॅमेरे बंद करायला लावूनच कार्यक्रमाला केली सुरुवात
- Trupati Desai on Indurikar Maharaj : 'गौतमी पाटीलचे नाव घेऊन इंदुरीकर स्वतःचे महत्त्व वाढवतात, तुम्हीच पैशाचाच बाजार मांडला'
- पीसीपीएनडीटी गुन्ह्यात इंदुरीकरांना दिलासा; निर्णयाविरोधात 'अंनिस' जाणार उच्च न्यायालयात