पिंपरी-चिंचवड (पुणे) - भोसरी परिसरातून एका सराईत आरोपीला भोसरी पोलिसांनी पिस्तूल आणि जिवंत काडतूसांसह अटक केली आहे. त्याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ओमकार मनोज बिसणारे (रा. चाकण), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
- भोसरी गावजत्रा मैदानात कंबरेला पिस्तूल बळगून फिरत होता आरोपी
भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चाकण येथील सराईत गुन्हेगार हा भोसरी गावजत्रा मैदान येथे कंबरेला पिस्तूल बाळगून असल्याची माहिती पोलीस कर्मचारी गणेश सावंत यांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांच्या पथकाने खात्री करून आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेले. याची चाहुल लागताच आरोपीने पळ काढला.
- आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल
पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल आणि जिवंत काडतूस आढळले. त्याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
- 'यांनी' केली ही कारवाई
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर कैलासे, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, गणेश सावंत, आशिष गोपी, संतोष महाडीक, सुमीत देवकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
हेही वाचा - मोदींकडे बघा ते 22 तास काम करतात; दुपारच्या झोपेवरून चंद्रकांत पाटलांचा पुणेकरांना चिमटा