पुणे Amruta Fadnavis On Nagpur Flood: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी माजी खासदार संजय काकडे आणि उषा काकडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी बाप्पाची आरतीदेखील केली. यावेळी त्यांना नागपूरच्या परिस्थितीवर विचारलं असता त्या म्हणाल्या की, यासाठी कोणतीही तयारी करण्यात आली नव्हती. अचानकपणे ढगफुटी सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. आज जे वातावरण बदल होत आहे. त्यामुळे असे संकट येत आहेत. पण यासाठी पुन्हा शून्यातून काम करण्याची गरज आहे. प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी आणली पाहिजे. नद्या स्वच्छ केल्या पाहिजेत. त्या स्वच्छदेखील ठेवल्या पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच पूर्ण लक्ष आहे. ते दोन दिवस तिथेच होते. मीदेखील तिथं जाणार आहे. नागरिकांकडून रोष व्यक्त होण स्वाभाविकच आहे, असं देखील यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या.
टीका होणं स्वाभाविकच: यावेळी अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होणं स्वाभाविकच आहे. लोकांना त्रास झाला आहे. म्हणून लोक बोलत आहे. पण, आता जी परिस्थिती तिथे झाली होती ती परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी कडक नियोजन करायला पाहिजे, असं देखील यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या.
उपमुख्यमंत्र्यांनी जबाबदारी पार पाडावी: गणेशोत्सवाबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या की, सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. मीदेखील पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांची भेट घेणार आहे. मी बाप्पा चरणी एवढीच प्रार्थना करेल की सर्वांना सुखी ठेव. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत काय मागणार? तर ते जिथं कुठे आहे तिथं त्यांना सर्वस्वी कामगिरी करण्याची ताकद दे. तसेच मी देवेंद्र फडणवीस यांच्या कुठल्याही पदासाठी काहीही मागितलेलं नाही. माझी इच्छा आहे की भाजपा एक नंबरचा पक्ष बनायला पाहिजे. फडणवीस यांना जी जबाबदारी देण्यात येईल, ती त्यांनी पूर्ण करावी, असं देखील यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या.
मुख्यमंत्र्यांविषयी काय म्हणाल्या अमृता: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाबाबत अमृता फडणवीस यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, ते खूप चांगले काम करत आहेत. ते कामाच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांचे भाऊ आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार हे एकमेव नेते माझे आवडीचे आहेत. तेदेखील आता आमच्या सोबत आहेत, याच आनंद आहे, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.
हेही वाचा:
- Muttemwar Criticized Gadkari Nagpur : फडणवीस आणि गडकरींनी शहराचा विकास नाही तर भकास केले; विलास मुत्तेमवार आणि नाना पटोलेंचा हल्लाबोल
- MLA Disqualification Hearing : आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणीत ठाकरे गटाची 'ही' आहे मागणी, शिंदे गटाचा विरोध
- Nagpur Rain : नागपुरात पावसाचा हाहाकार; शाळांना सुट्टी जाहीर, भारतीय सैन्याकडून मदतकार्य