पुणे - पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज (दि. 20 सप्टें.) नव्या पदाची सूत्रे हाती घेतली. मावळते पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांच्याकडून गुप्ता यांनी पदभार स्वीकारला.
राज्याचे गृहमंत्री आज (रविवार) पुण्यात असल्याने काही मोजक्याच पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्तपदाची सूत्रे घेतली. पुणे पोलीस आयुक्त पदावर नियुक्तीबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होण्यासाठी गुप्ता यांच्यासह अनेक मोठी नावे चर्चेत होती. त्यानुसार गुरुवारी रात्री राज्याच्या गृह विभागातर्फे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता यांच्या नाव जाहीर करण्यात आले. त्यानंतर पोलीस आयुक्त बदलीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. डॉ.वेंकटेशम यांची अप्पर पोलीस महासंचालकपदी (विशेष अभियान) नियुक्ती करण्यात आली आहे.
कोरोनाच्या काळात अमिताभ गुप्ता यांचे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवरही पाठवण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांची पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली आहे.
हेही वाचा - गृहमंत्र्यांनी 'त्या' पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावीत; अन्यथा.., प्रकाश आंबेडकरांचा इशारा