पुणे - काल शनिवारी पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे स्वागत करण्यात आले. मात्र, या स्वागतासाठी रस्त्यात लावण्यात आलेल्या एका फ्लेक्समुळे तातडीने जाणारी एक रुग्णवाहिका अडकून पडली होती.
हेही वाचा - महाजनादेश यात्रेचे पुण्यात जंगी स्वागत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शनिवारी दुपारी पुणे जिल्ह्यात दाखल झाली. या यात्रेचे पुणे शहरात ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. या यात्रेच्या स्वागतादरम्यान अनेकांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणारे अनेक फ्लेक्स लावण्यात आले होते. रस्त्यात लावण्यात आलेल्या एका फ्लेक्समुळे तातडीने जाणाऱ्या एक रुग्णवाहिकेला अडथळा निर्माण झाला. तर, अनेक वाहनेही रस्त्यावर अडकली होती.