पुणे- गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संखेने गणेशभक्त बाप्पाच्या भव्य मिरवणुकीत सामील झाले होते. मात्र, येथील अलका चौकामध्ये गणेशोत्सवाच्या मिरवणुकी दरम्यान रुग्णवाहिकेला गणेशभक्तांनी वाट करुन देत माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
हेही वाचा- शहरात विविध ठिकाणी ९ जणांना वाचवण्यात अग्निशामक दलाला यश
अलका चौकातुन जाणाऱया गणपती मिरवणुकी दरम्यान एक रुग्णवाहिका आली. मात्र रत्यावरील गर्दी मोठी होती. पोलीस याठीकाणी उपस्थित होते. मात्र गर्दी खुप होती. दरम्यान गणेशभक्तांनी ती रुग्णवाहिका पाहिली आणि पोलिसांना सहकार्य करत काही क्षणात रस्ता मोकळा केला.