पुणे : उद्धव ठाकरे यांची ताकद क्षीण झाली आहे. प्रकाश आंबेडकर त्यांच्या सोबत गेले. मात्र, त्याला शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली,असे म्हणता येणार नाही. बाळासाहेब ठाकरे असतांना शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली होती. विरोधकांकडून दिशाभूल सुरू आहे. मात्र त्याचा उपयोग होणार नाही. खरी भीमशक्ती नरेंद्र मोदींसोबत आहे. उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांची युती ही उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि वंचित ची युती म्हणता येईल .तिला शिवशक्ती भीमशक्ती म्हणता येणार नाही. अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज वंचित आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना युतीवर केली आहे.
आरपीआयचा भाजपला पाठिंबा : बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष चालवायचा असेल तर अधिक व्यापक व्हायला लागेल. सर्व जाती धर्माच्या लोकांना पक्षात आणावे लागेल. आगामी महापालिका निवडणुका भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या सोबत जाऊन लढवणार असुन निवडणूका जिंकण्याचा निर्धार करण्यात आला असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे. कसबा आणि चिंचवड पोट निवडूक बिनविरोध व्हावी. विरोधकांनी त्याला पाठिंबा असेल तर तीच दिवंगत आमदारांना आदरांजली असेल निवडणुका झाल्या तर आरपीआयचा भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा असेल असे रामदास आठवले यांनी जाहीर केले आहे.
पठाणला विरोधाचे कारण नाही : भाजपने रिपब्लिकन पक्षाला डावलू नये. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांची युती झाली आहे. रिपब्लिकन पक्ष आधीपासून त्यांच्यासोबत आहे. आमच्या सहभागामुळे महायुती तयार झाली होती. त्यामुळे त्यांनी आमचे नाव घेतले पाहिजे. बजरंग दलाने पठाण चित्रपटाला विरोध दर्शवला तर, त्याला मी काय करू. त्या चित्रपटातील गाण्यात भगव्या रंगाला बेशरम रंग म्हटले होते. परंतु सेन्सॉर ने तो रंग हटवला आहे. त्यामुळे आता विरोधाचे कारण नाही असे रामदास आठवले यावेळी म्हणाले आहेत.
कोश्यारींना पद सोडण्याची इच्छा - राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी जावं असे विरोधकांना वाटते. आम्हाला तसे वाटत नाही. राज्यपाल पद सोडण्याची इच्छा त्यांनी स्वतःहून व्यक्त केली आहे. पंतप्रधान त्याबाबत निर्णय घेतील. अशी भूमिका आहे त्याने यावेळी मांडले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या अधिवेशन शिर्डीमध्ये होणारा तुम्ही अधिवेशनाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आमंत्रण देण्यात येणारा असून कार्यकर्त्यांनी सोबत चर्चा करण्यात येणार आहे अशी, माहिती सुद्धा यावेळी रामदास आठवले यांनी दिलेली आहे रामदास आठवले आज पुणे दौऱ्यावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.
हेही वाचा - Mahesh Tapase : सरकार स्थापनेचे राज्यपालांकडून आमंत्रणच नव्हते, मग हे सरकार संविधानिक कसे? -तपासे