पुणे - शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. संपूर्ण शहर सील करण्यात आले असून कर्फ्यू कडक करण्यात आला आहे. मात्र, तरीदेखील रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत नाही. त्यामुळे, आता बुधवार आणि गुरुवार हे दोन दिवस शहराच्या काही भागात खरेदीला पूर्ण मनाई करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूच्या रूग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. बुधवारी 22 एप्रिल आणि गुरूवारी 23 एप्रिलला कोणत्याही खरेदीला परवानगी नाही. सकाळी 10 ते 12 या दरम्यान फक्त दूध आणि औषध विक्री सुरू राहणार आहे. वारंवार आवाहन करूनही या भागात नागरिक गर्दी करत असल्याने पोलिसांनी रात्री उशिरा यासंबंधीचे आदेश लागू केले.
याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. बुधवारी सकाळीच या भागात रस्त्यावर फिरत असलेल्या नागरिकांना पोलिसांनी सक्तीने घरांमध्ये पाठवले. किराणामालासह अन्य सगळी दुकानेही बंद करायला लावली. शहरातील दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील परिसरात 23 एप्रिलच्या मध्यरात्री 12 पर्यंत पोलिसांचा हा आदेश लागू आहे.
प्रतिबंधित क्षेत्र -
1 परिमंडळ एक -
समर्थ, खडक आणि फरासखाना पोलिस ठाण्याचे संपूर्ण क्षेत्र
2 परिमंडळ दोन -
स्वारगेट पोलिस ठाणे - गुलटेकडी, महर्षीनगर, डायसप्लॉट-बंडगार्डन पोलिस ठाणे- ताडीवाला रस्ता
3 परिमंडळ तीन -
दत्तवाडी पोलिस ठाणे- जनता वसाहत, पर्वती दर्शन परिसर, शिवदर्शन
4 परिमंडळ चार -
येरवडा पोलिस ठाणे-लक्ष्मीनगर, गाडीतळ-खडकी पोलिस ठाणे- खडकी बाजार, कसाई मोहल्ला, पाटील इस्टेट झोपडपट्टी
5 परिमंडळ पाच -
कोंढवा पोलिस ठाण्यात संपूर्ण भाग-वानवडी पोलिस ठाणे- विकासनगर, सय्यदनगर, रामटेकडी,चिंतामणी नगर, वॉर्ड क्रमांक 24, हांडेवाडी, वॉर्ड क्रमांक 26 आणि 28