पुणे - पुण्यातील 69 भागात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. त्यामुळे हे भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. पुण्यातील इतर भागात लॉकडाऊन आणि संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे. परंतु कंटेन्मेंट झोनमधील अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सकाळी 10 ते 2 वेळेतच सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, येथील नागरिक लॉकडाऊन आणि संचारबंदीचे सर्रास उल्लंघन करताना आढळून आले आहे. त्यामुळे हे सर्व झोनमध्ये आता लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी या संदर्भातील आदेश काढला आहे.
गरज भासल्यास या परिसरात महापालिका आणि पोलीस यांच्यावतीने घरपोच सेवा दिली जाईल अथवा मोकळी जागा पाहून आवश्यकता भासल्यास इतर दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाईल असेही महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
पुण्यातील कंटेन्मेंट झोनमधील वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने पुढील सात दिवस बंद..! - Containment Zone in Pune will be closed
सर्व झोनमध्ये आता लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी या संदर्भातील आदेश काढला आहे.