ETV Bharat / state

तिसऱ्या लाटेचा विचार करुन सर्व विभागांनी प्रभावीपणे यंत्रणा राबवावी - अजित पवार - Ajit pawar corona review baramati

बारामती तालुक्यातील सर्व रुग्णालयांमध्ये फायर व ऑक्सिजन ॲाडिट वेळेवर करुन घ्यावे. सर्व रुग्णालयामध्ये जनरेटरची सुविधा असणे, रुग्णालये स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.

ajit pawar
अजित पवार
author img

By

Published : May 22, 2021, 3:44 PM IST

बारामती (पुणे) - कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करुन सर्व विभागांनी प्रभाविपणे यंत्रणा राबवावी. या लाटेमध्ये लहान बालकांनाही लागण होण्याचा धोका संभावतो आहे. तरी त्यांच्यासाठी रुग्णालयामध्ये स्वतंत्र बेड राखीव ठेवण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. अजित पवार यांनी आज (शनिवारी) येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेतला.

हेही वाचा - 'राज्यपालांच्या डोक्यात काय आहे, तेच माहिती नाही'; मंत्री गुलाबराव पाटलांनी डागले टीकास्त्र

निधीची कमतरता कमी पडू देणार नाही -

बारामती तालुक्यातील सर्व रुग्णालयांमध्ये फायर व ऑक्सिजन ॲाडिट वेळेवर करुन घ्यावे. सर्व रुग्णालयामध्ये जनरेटरची सुविधा असणे, रुग्णालये स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. कोविड सेंटर तपासणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. सध्या कोरोना रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत आहे. याशिवाय मृत्यू दर नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. कोणत्याही रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यासाठी अगोदरच नियोजन करुन ठेवावे. तसेच यासाठी निधीची कमतरता कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा - पोलीस अधिकाऱ्याने वृद्ध महिलेचा भाजीपाला फेकला रसत्यावर; व्हिडिओ व्हायरल

म्यूकरमायकोसिसचा प्रादुर्भाव -

कोरोना रुग्णांमध्ये म्यूकरमायकोसिसचा प्रादुर्भाव वाढत आहे. या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. या रोगासाठीच्या औधषांच्या पुरवठ्यामध्ये गैरप्रकार न होता योग्य वापर व नियोजन करण्यात यावे. कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांना म्युकरमायकोसिस अथवा अन्य काही लक्षणे दिसल्यास याची माहिती दूरध्वनीवरुन घेण्यात यावी, अशा सूचनाही यावेळी अजित पवार यांनी दिल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.