ETV Bharat / state

मी काही ज्योतिषी नाही अन मी पोपटलाही विचारलं नाही - अजित पवार - ncp

माझा एक्झिट पोलवर विश्वास नाही, आणि एक्झिट पोलसारखे निकाल लागतील असे वाटत नाही. जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादी सोडली हा त्यांचा प्रश्न आहे.

मी काही ज्योतिषी नाही
author img

By

Published : May 22, 2019, 4:37 PM IST

Updated : May 22, 2019, 8:06 PM IST

पुणे - भाजपच्या किती जागा येतील किंवा काँग्रेस - राष्ट्रवादीच्या किती जागा निवडून येतील यावर मी आत्ताच काही सांगू शकत नाही. मी काही ज्योतिषी नाही अन मी पोपटलाही विचारलं नाही. कोणी लाडू आणून ठेवावे अथवा कोणी आणखी काही करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एक्झिट पोलवर माझा विश्वास नाही. एक्झिट पोलसारखे निकाल लागतील असे वाटत नाही. निकालाबाबत अंदाज व्यक्त करण्यास स्पष्ट शब्दात नकार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले.पुण्यात दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मी काही ज्योतिषी नाही

जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांच्या कौटुंबिक वादातून राष्ट्रवादी सोडली. विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन ते शिवसेनेत गेले आहेत. ते गेल्यामुळे पक्षाचे नुकसान तर झाले आहे. अधिक काम करून आम्ही ते नुकसान भरून काढू असेही अजित पवार म्हणाले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना निर्विवाद बहुमत मिळेल, हे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हते, पण ते मिळाले. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनाही तसे वाटत नव्हते. परंतु 'अंडरकरंट' इतका वेगळा होता की, तो कुणाच्याच लक्षात आला नाही. तो 'अंडरकरंट' जबरदस्त होता. एक्झिट पोलवर माझा विश्वास नाही आणि त्यासारखे निकाल लागतील असे ही वाटत नाही. असेही ते म्हणाले.

Intro:Pune:-

 *अजित पवार* 

मी काही ज्योतिषी नाही अन मी पोपटलाही विचारलं नाही की आमच्या किती जागा येतील..कोणी लाडू आणून ठेवावे अथवा आणखी कोणी आणखी काही करावे..हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे...एक्सझिट पोलवर माझा विश्वास नाही..एक्सझिट पोलसारखे निकाल लागतील असे वाटत नाही..

Body:जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांच्या कौटुंबिक वादातून राष्ट्रवादी सोडली..विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन ते शिवसेनेत गेले आहेत..ते गेल्यामुळे पक्षाचं नुकसान तर झालंच..अधिक काम करून आम्ही ते नुकसान भरून काढू..

Conclusion:ok
Last Updated : May 22, 2019, 8:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.