ETV Bharat / state

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या भेटीबाबत अजित पवार म्हणाले... - अजित पवार यांची शिवेंद्र राजेंसोबत भेट बातमी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज बारामती येथे घेतली. या भेटीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता, विकास कामासंदर्भात आमदार खासदारांचे एकमेकांना भेटणे होत असते, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

ajit pawar said about visit with mla shivendra raje bhosale
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या भेटीबाबत अजित पवार म्हणाले...
author img

By

Published : Jan 24, 2021, 4:34 PM IST

बारामती (पुणे) - साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या भेटीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता, विकास कामासंदर्भात आमदार खासदारांचे एकमेकांना भेटणे होत असते. मी विरोधी पक्षात असताना विकास कामाबाबत त्यावेळच्या राज्यकर्त्यांकडे माझी कामे घेऊन जात होतो. तशीच सातारा मतदारसंघाच्या विकास कामासंदर्भात शिवेंद्रराजे भोसले यांनी भेट घेतली, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

अजित पवार यांची प्रतिक्रिया

पक्षप्रवेशाची शिंदे यांना कोणी दिली ऑफर -

युतीचे सरकार असताना भाजपकडून मला पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती. असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी केला. भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात अनेक नेत्यांना पक्षप्रवेशाच्या ऑफर देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये माझाही समावेश होता, असा दावा शशिकांत शिंदे यांनी नुकताच केला आहे. यावर बोलताना, यासंदर्भातील वृत्त मी माध्यमावर पाहिले आहे. याबाबत शिंदे यांच्याशी मुंबईत चर्चा करून पक्ष प्रवेशाची ऑफर कोणी व कशासाठी दिली होती, याची इत्थंभूत माहिती घेतल्याशिवाय अधिक बोलणे उचित ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली.

नोकरभरतीत कोणताही समाज वंचित राहणार नाही -

नागरिकांचे आरोग्य व कायदा सुव्यवस्था चांगले ठेवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय विभाग व पोलीस खात्यातील भरती करणे अत्यंत गरजेचे आहे. या संदर्भात मी मागेच संबंधितांशी बोललो आहे. भरती करत असताना मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयात निर्णय प्रक्रिया चालू आहे. जानेवारीमध्ये याबाबत निर्णय अपेक्षित होता. मात्र, आरक्षणाचा निर्णय फेब्रुवारीमध्ये गेला आहे. मात्र, राज्यात वेगवेगळी नोकरभरती होत असताना कोणताही समाज घटक वंचित राहणार नाही, याबाबत महाविकास आघाडीचे सरकार कटीबद्ध असल्याचे पवार यांनी सांगितले.

हेही वाचा - ओबीसीची जातीनिहाय जनगणना करा; पंकजा मुंडेंनी केली मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.