ETV Bharat / state

लॉकडाऊन काळातील पोलिसांचे कार्य कौतुकास्पद - अजित पवार - Presentation of Corona Prevention Measures in pune

शहर पोलीस आयुक्तालयात पुणे पोलिसांनी लॉकडाऊन काळात केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर करण्यात आले. तसेच पुणे पोलिसांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचेही उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, पवारांनी रक्तदान शिबिरात प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याची वैयक्तिक चौकशी करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

अजित पवार
अजित पवार
author img

By

Published : Jun 12, 2020, 5:05 PM IST

पुणे - शहर पोलीस आयुक्तालयात पुणे पोलिसांनी लॉकडाऊन काळात केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर करण्यात आले. तसेच पुणे पोलिसांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचेही उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पोलीस आयुक्त व्यंकटेशम, सहपोलीस आयुक्त आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

पुण्यात पोलिसांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, पवारांनी रक्तदान शिबिरात प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याची वैयक्तिक चौकशी केली. जवळपास तीन महिने झाले तुम्ही सतत कर्तव्यावर आहात. गणेशोत्सव, दिवाळी, मोहर्रम यादरम्यान ड्युटी केल्यानंतर आराम करण्यासाठी काही वेळ मिळतो. परंतु, लॉकडाऊनच्या या काळात सतत तीन महिने झाले, तुमचे काम सुरू आहे. हे अभिमानास्पद आहे. यासाठी मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो, असे पवार म्हणाले.

लॉकडाऊन दिवसेंदिवस वाढत असताना आपल्या सर्वांवर ही मोठी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आम्हा सर्वांना पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. स्कॉटलँड पोलिसानंतर महाराष्ट्र पोलिसांचा नंबर लागतो, असे बोलले जाते, ते खरेही आहे. लॉकडाऊनच्या काळातही तुम्ही अतिशय हिमतीने काम करीत आहात, असे पवार म्हणाले. त्यांनी पुणे पोलिसांच्या निमित्ताने राज्यातील सर्वच पोलिसांचे कौतुक केले.

लॉकडाऊनच्या काळात पुणे पोलिसांनी केलेले मदतकार्य खूप मोलाचे होते. पोलीस आयुक्तांनी त्याची सर्व माहिती मला दिली. कुणी बाहेरच्या विद्यार्थ्यांना घरी पाठवण्याचे काम केले. कुणी आत्महत्या करण्यासाठी निघालेल्याला वाचवले असेल. कुणी आजीच्या वाढदिवस साजरा केला. संकटकाळात पोलिसांनी दाखवलेले धैर्य हे मोलाचे आहे. एक अर्थमंत्री या नात्याने तुम्ही केव्हाही मला तुमचा उत्साह वाढण्यासाठी एखादी गोष्ट सांगितली तर, अशावेळी मी नेहमी तुमच्याबरोबर राहीन अशी खात्री मी तुम्हाला देतो, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.