ETV Bharat / state

Ajit Pawar : जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये - अजित पवार

author img

By

Published : Nov 14, 2022, 4:57 PM IST

Updated : Nov 14, 2022, 7:36 PM IST

माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या आमदार पदाच्या राजीनाम्याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त ( Ajit Pawar on Jitendra Avhad resignation ) केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा देऊ नये. तसेच आव्हाडांवरील जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तो गुन्हा मागे घेण्यात यावा, अशी मागणी देखील अजित पवार यांनी केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

पुणे : राष्ट्रवादीचे आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांना वर्तकनगर पोलिसांनी मारहाणीच्या आरोपाखाली अटक केली होती. आता एका महिलेने त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. आव्हाड यांच्याविरुद्ध भादंवि कलम 354 अन्वये ठाण्यातील मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यावर आव्हाड यांनी मी आमदारकीचा राजीनामा देत आहे, असे म्हटले आहे.

आव्हाडांनी राजीनामा देऊ नये - राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा ( Ajit Pawar on Jitendra Avhad resignation ) देऊ नये. ज्या शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो त्या शरद पवारांनी अनेक चढ उतार पाहिलेत, अनेक स्थित्यंतर पाहिली आहेत, त्यामुळे आव्हाडांनी राजीनामा देऊ नये, असे यावेळी पवार यांनी सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी सावित्रीबाई फुले प्रगती पॅनलच्या मुख्य निवडणूक कचेरीचे उद्घाटन राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार व अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

जितेंद्र आव्हाडांच्या आमदार पदाच्या राजीनाम्याबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना

राज्य सरकारकडून पोलिस प्रशासनाचा दुरूपयोग - मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे पोलीसांचा प्रशासनाचा दुरूपयोग करत आहेत. आपण जर तो व्हिडिओ पहिला तर जितेंद्र आव्हाड अनेकांना हाताने बाजूला करत होते. तसेच त्यांनी या महिलेला बाजुला केले. बाकी काही घडलेले नाही. तसेच मुख्यमंत्र्यांपासून काही अंतरावर हा प्रकार घडलाय. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढे येऊन सांगायला पाहिजे की काय प्रकार झाला आहे. तुम्ही कशाही प्रकारे मुख्यमंत्री झाला असलात तरी तुम्ही महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेचे प्रतिनिधि आहात याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे, असे यावेळी अजित पवार म्हणाले.

गुन्हा मागे घेण्याची केली मागणी - सध्या महाराष्ट्रात अतिशय गलिच्छ प्रकार सरु आहे. हा जो प्रकार सुरू आहे तो भ्याडपणा आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून यात लक्ष घालण्याची गरज आहे. कारण नसताना जर लोकप्रतिनिधींना बदनाम करण्याचे, अपमानित करण्याचे काम होत असेल तर जनतेने याची दखल घ्यायला हवी. जितेंद्र आव्हाडांवरील जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो गुन्हा मागे घेण्यात यावा, असे देखील यावेळी पवार म्हणाले.

Last Updated : Nov 14, 2022, 7:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.