ETV Bharat / state

Ashadhi wari 2023: बारामतीत आषाढी वारीत अजित पवारांनी घेतला फुगडी खेळण्याचा आनंद

दरवर्षी याही वर्षी पालखी मुक्कामाला बारामती होती. त्यावेळी अजित पवारांनी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सारथ्य केले. तसेच फुगडी खेळून त्यांनी आषाढी वारीचा आनंद लुटला.

Ashadhi wari 2023
आषाढी वारी 2023
author img

By

Published : Jun 19, 2023, 9:12 AM IST

आषाढी वारी 2023

बारामती : यंदा पावसाने साथ दिलेली नाही. ती दिली असती तर पालखी सोहळ्यातील संख्या वाढली असती. तरी मोठा उत्साह दिसतो आहे. रस्ते मोठे रुंद झाले आहेत. त्यामुळे चालताना सोपे जाते. पूर्वी रस्ते अरुंद असल्यामुळे वारीला अडथळा निर्माण व्हायचा. बारामतीकरांचा उत्साह खूप होता. अबालवृद्ध सहभागी झाले. मलाही सोहळ्यात सहभागी झाल्याने समाधान वाटले, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

संतांच्या विचाराने वाटचाल : संतांच्या विचाराने आपण सर्वांनी वाटचाल करणे गरजेचे आहे. प्रचंड जनसमुदाय, माणूसकी जपायची असते. माझ्या सहकाऱ्यांकडून अनेकदा मला पालखी सोहळ्यात सहभागी होण्याची मागणी केली जात होती. दरवर्षी पालखी मुक्कामाला बारामतीत असते. त्यामुळे यंदा सहभागी होत सारथ्य करण्याचा योग आला. मनाला वेगळे समाधान मिळाले. मी उपमुख्यमंत्री असताना अनेकदा कार्तिक एकादशीला सपत्निक आरती, महापूजेसाठी पंढरपूरला उपस्थित राहिलो आहे. परंतु यंदा आषाढी एकादशीच्या निमित्ताने सोहळ्यात सहभागी होता आले. ज्येष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्री असताना मी सलग तीन वर्षे कुटुंबासह पंढरपूरला आषाढीला आरती व महापूजेसाठी गेलो होतो. मला अनेकदा बारामतीकरांच्यामुळे महाराष्ट्रातील जनतेमुळे महापूजेचा मान मिळाला, ही समाधानाची बाब आहे.

आनंद घेतला : पूर्वी आम्ही काटेवाडीला राहायला होतो. तेथे मोठा गोठा होता. बारा बैलांचा गोठ्यात समावेश होता. आजही दोन चांगली बैल दोन गोठ्यात आहेत. आज पालखी सोहळ्यातील बैलजोडी पाहिली. त्यात मनाला समाधान मिळाले. फुगडी खेळत आनंद घेतला. पूर्वीच्या काळात मी खेळताना चक्कर यायची नाही, पण आज जरा फुगडी खेळताना चक्कर आली. सोहळ्यात सहभागी होताना काही मागितले नाही. फक्त आनंद घेतला.

संजय राऊतांना बोलण्याचा अधिकार : आम्हाला वाटते तोवर आम्ही महाविकास आघाडीत राहू, या खासदार संजय राऊत यांच्या विधानाबद्दल पवार म्हणाले, प्रत्येकाला आपापला पक्ष वाढविण्याचा, पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आजच्या घडीला आम्ही तीन पक्ष एकत्र आहोत. तिघे एकत्र आल्याशिवाय आम्ही भाजप-शिंदे सेना यांचा मुकाबला करू शकत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना संजय राऊत हे आमची आघाडी २५ वर्षे टिकेल, असे म्हणत होते. आता त्यांना पुढे त्यांच्या एकट्याचे सरकार यावे, असे वाटत असेल तर त्यात चुकीचे काय असा सवाल पवार यांनी केला. त्यांची इच्छा त्यांनी बोलून दाखवली. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.

बावनकुळे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया : २०२४ च्या निवडणूकीनंतर सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री व आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री करायचे होते. त्यामुळे शिवसेना फुटली. या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर पवार म्हणाले, बावनकुळे जर मनकवडे असतील तर मग न बोललेले बरे. असे काही नसते. उगीच काही तरी बातम्या पसरवता. तुम्ही बातम्या दाखवता आणि मला विचारता, ते असे बोलले तुमचे काय मत आहे. जे व्यवहारी बोलतात, वागतात ते एका कानाने ऐकतात, दुसऱ्या कानाने सोडून देतात.

हेही वाचा :

  1. Ashadhi wari 2023 : ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन; माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान
  2. Ashadhi wari 2023: सात वेळा केला रायगड सर, 80 वर्षीय आजी वारीत सहभागी, जाणून घ्या त्यांचा अनुभव
  3. Ashadhi wari 2023: वारीसारखा जगात कुठेही आनंद नाही... 21 दिवसांची सुट्टी घेऊन दोन बहिणी सोहळ्यात दंग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.