ETV Bharat / state

Ajit Pawar in Kolhapur: कोल्हापुरात शरद पवारांनंतर अजित पवार सभा घेऊन करणार शक्तीप्रदर्शन - Ajit Pawar power show

Ajit Pawar in Kolhapur : कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार देखील 10 तारखेला उत्तर सभा घेणार आहेत. अजित पवारांच्या या सभेला पुण्यातून अनेक कार्यकर्ते जाणार आहेत. यावेळी कार्यकर्त्यांकडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी करण्यात येतेय.

Ajit Pawar in Kolhapur
अजित पवार कोल्हापुरात
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2023, 7:34 PM IST

पुणे Ajit Pawar in Kolhapur : अजित पवार आणि शरद पवार यांचा राजकीय संघर्ष (sharad pawar Ajit pawar contraversy) सुरू आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी शरद पवार यांनी सभा घेतल्या, त्या ठिकाणी अजित पवार यांनी उत्तर सभा घेतल्या आहेत. शरद पवार ज्याठिकाणी सभा घेतील, त्या ठिकाणी आम्ही देखील उत्तर सभा घेवू, असं अजित पवारांनी सांगितलंय. शरद पवारांनी बीडमध्ये सभा घेतल्यानंतर अजित पवारांनी देखील बीडमध्ये सभा घेतली होती. यामुळं शरद पवार यांच्या सभेला जशास तसं उत्तर देण्याची तयारी अजित पवार गटाकडून करण्यात येतेय. (ajit pawar rally update) यासंदर्भात एक बैठकसुद्धा बोलावण्यात आलीय.

शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी : कोल्हापूरच्या सभेला जाताना शरद पवार जागोजागी कार्यकर्त्यांना भेटत होते. शक्तीप्रदर्शन केलं जात होतं. जागोजागी त्यांचा सत्कार करण्यात आला होता. तसंच शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी अजित पवार गट करत असून, कोल्हापुरातील अजित पवारांच्या सभेपूर्वी जिजाई बंगला ते खेड शिवापूर मार्गावर एक रॅली काढण्यात येणार आहे. अजित पवार या रॅलीत सहभागी होणार आहेत. (ncp contraversy)

भव्य रॅली : यासंदर्भात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं एक बैठक बोलावलीय. त्यानंतर त्याचे स्वरूप स्पष्ट करण्यात येणार आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात आल्यानंतर ज्यापद्धतीने त्यांचं भव्य रॅली काढून स्वागत करण्यात आलं होतं, त्याचप्रमाणं स्वागत करण्याची तयारी आता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आलीयं. पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसरचे आमदार चेतन तुपे आणि शिरूरचे आमदार अशोक पवारांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांची रॅली आमदार अशोक पवारांच्याच मतदारसंघातून जाणार असल्यानं अशोक पवार काय भूमिका घेतात, याकडंसुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय. (Ajit Pawar power show)

हेही वाचा :

  1. Maratha Morcha Baramati: अजित पवारांचा पेच आणखीनच वाढला; सरकारमधून बाहेर पडण्याचं बारामतीकरांचं आवाहन
  2. Maratha Andolan: अजित पवार सभेसाठी कोल्हापुरात आल्यास उद्रेक, सकल मराठा समाजाचा इशारा
  3. Ajit Pawar On Lathicharge : राज्यसरकार आंदोलकांच्या भावनांशी सहमत, अजित पवारांनी दिले दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.