ETV Bharat / state

...आता येथून पुढे 'नो कॉमेंट्स' - अजित पवार

author img

By

Published : Nov 17, 2019, 11:55 PM IST

मी गाडीतून निघालो असता पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर मी सहज बारामतीला निघालो असे बोललो. पण माध्यमातून याचा विपर्यास करून अजित पवार नाराज होऊन बारामतीला परत निघाल्याचे सांगितले. तेव्हापासून मी कानाला खडा लावात ठरवले आहे, की काहीच न बोलता 'नो कॉमेंट्स' म्हणून पुढे निघायचे.

आता येथून पुढे 'नो कमेंन्टस' - अजित पवार

पुणे - काही दिवसांपूर्वी सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या महत्वाच्या बैठकीतून अजित पवार नाराज होवून निघून गेल्याची बातमी आली होती. बारामती तालुक्यातील सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचा ५८ व्या गव्हाण पूजन आणि गळीत हंगाम कार्यक्रम अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी याबाबतचा खुलासा केला आहे.

आता येथून पुढे 'नो कमेंन्टस' - अजित पवार

हेही वाचा - काँग्रेससोबत चर्चा करुन लवकरच पर्यायी सरकार स्थापन करणार - नवाब मलिक

पवार म्हणाले, की सत्तास्थापनेच्या पेच प्रसंगावर चर्चा करण्यासाठी आम्ही ज्या ठिकाणी बैठक घेणार होतो, त्याठिकाणी सर्वसामान्यांना त्रास होत असल्यामुळे आम्ही अज्ञातस्थळी बैठक घेण्याचे ठरविले. त्यावेळी मी गाडीतून निघालो असता पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर मी सहज बारामतीला निघालो असे बोललो. पण माध्यमातून याचा विपर्यास करून अजित पवार नाराज होऊन बारामतीला परतले निघाल्याचे सांगितले. तेव्हापासून मी कानाला खडा लावात ठरवले आहे, की काहीच न बोलता 'नो कॉमेंट्स' म्हणून पुढे निघायचे.

हेही वाचा - जनतेच्या मनातील सरकार आणण्यासाठी पवारसाहेबांचा प्रयत्न - जयंत पाटील

बारामतीच्या मतदारांनी सातव्यांदा विधानसभेत निवडून दिल्याबद्दल अजित पवारांनी खास आपल्या शैलीत मतदारांचे आभार मानत मतदारांना साष्टांग नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. पवार पुढे म्हणाले, की महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी या वयात पवार साहेबांनी महाराष्ट्र पिंजून काढला. पवार साहेबांच्या बाबतीत नको त्या गोष्टी करण्याचा झालेला प्रयत्न आणि साहेबांना काढलेली ईडीची नोटीस हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला रुचले नाही म्हणूनच महाराष्ट्रात पहिल्यांदा असा निकाल लागला की बहुमत असणाऱ्यांच्या नाराजी तर अल्पमतात असणाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. राष्ट्रवादीचे अनेक नवनिर्वाचित आमदारांना बळजबरीने तिकिटे दिली. सुरुवातीला काय होईल माहिती नव्हते. मात्र, पवार साहेबांच्या झंझावाती प्रचारामुळे ते सर्व आमदार झाले, असेही पवार यांनी सांगितले.

Intro:Body:
बारामती
बारामतीकरांनो साष्टांग नमस्कार...

बारामतीकरांनी मला सातव्यांदा निवडून दिले मात्र मागील सहा वेळेस पेक्षा आताच्या निवडणुकीत बारामतीकरांनी प्रत्येक मतदार केंद्रातून शंभर टक्के आघाडी दिल्याबद्दल साष्टांग नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. बारामती तालुक्यातील सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचा 58वा गव्हाण पूजन व गळीत हंगाम कार्यक्रम संपन्न झाला संपन्न झाला. या कार्यक्रमाचा शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला .विधानसभेच्या निकालानंतर यावेळी पहिल्यांदाच जनतेशी संवाद साधला.

पुढे म्हणाले महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासासाठी या वयात पवार साहेबांनी महाराष्ट्र पिंजून काढत सातारा येथे पावसात घेतलेली सभा तसेच पवार साहेबांच्या बाबतीत नको त्या गोष्टी करण्याचा झालेला प्रयत्न साहेबांना काढलेली ई डी ची नोटीस हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला रुचलं नाही आणि म्हणूनच महाराष्ट्रात पहिल्यांदा असा निकाल लागला की बहुमत असणाऱ्यांच्या नाराजी तर अल्पमतात असणाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे राष्ट्रवादीचे अनेक नव निर्वाचित आमदारांना बळजबरीने तिकिटे दिली सुरुवातीला काय होईल माहिती नव्हतं मात्र पवार साहेबांच्या किमिया मुळे ते सर्व आमदार झाले असे मत पवार यांनी व्यक्त केले...

....................................

अजित पवारांचे सत्ता स्थापने संदर्भात सूचक वक्तव्य..

सत्तास्थापनेचे संदर्भात चालू असणाऱ्या चर्चेत तथ्य आहे असे समजून पहिल्याच गाडीने मुंबईकडे निघण्याची घाई करू नका माझ्या निरोपाची वाट बघा सत्तास्थापनेसाठी 145 चा आकडा गाठावा लागतो अजून अनेक पक्षाची विचारधारा ध्येयधोरणे वेगवेगळे असतात याचाही विचार करावा लागतो तसेच आघाडीच्या मित्र पक्ष्यांशी बोलणी करायची आहेत

म्हणून नो कॉमेंट्स...

सत्तास्थापनेच्या पेच प्रसंगावर चर्चा करण्यासाठी आम्ही जेथे बसणार होतो त्याठिकाणी सर्वसामान्यांना त्रास होत असल्यामुळे आम्ही अज्ञात स्थळी बैठक घेण्याचे ठरविले त्यावेळी मी गाडीतून निघालो असता प्रसारमाध्यमांनी प्रश्न केल्यावर मी सहज बारामतीला निघालो असल्याचे म्हटल्यावर माध्यमातून याचा विपर्यास करून अजित पवार नाराज होऊन बारामतीला परतले असल्याचे सांगितले गेले. तेव्हापासून कानाला खडा लावत ठरवले आहे की काहीच न बोलता नो कॉमेंट्स म्हणून पुढे निघायचे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.