पुणे : आजपर्यंतच्या इतिहासात कधीही पोलीस भरतीमध्ये उमेदवारांना नियुक्तीचे पत्र मंत्री,आमदार मुख्यमंत्री यांनी दिलेले नाही. राज्यात बाहेर गेलेले रोजगार आणि त्यामुळे तरुणांमध्ये झालेली नाराजी आली आहे. त्यांना आलेले अपयश लपवण्यासाठी पोलीस भरतीवरून शिंदे फडवणीस सरकार नौटंकी करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पुण्यात केली ( Ajit Pawar Criticise On police recruitment) आहे.
अजित पवार संतप्त : केसरकर यांनी खोकल्यावर केलेल्या वक्तव्यावर सगळ्यांचेच एकदा काढा, दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या असेही विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांनी म्हटले ( Ajit Pawar Criticise Shinde Fadnavis Govt ) आहे. पोलीस भरतीमध्ये सुद्धा त्याचे नियम बदलण्याचा सरकारचा मानस दिसत आहे. परंतू आमच्या काळात अगोदरच शारीरिक परीक्षा त्यानंतर लेखी परीक्षा होत होती. त्यामध्ये सुद्धा खूप अडचणी आहेत. त्या सगळ्या अडचणी आणि नियम बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. उद्या मी मुंबईत गेलो की उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्या संदर्भात माझ्याकडे तक्रारी आलेल्या आहेत असेही अजित दादा पवार म्हणाले आहेत.
राज्यपालांना कोणी नेमले : राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात आज छत्रपती उदयनराजे संभाजीराजे आक्रमक होत आहेत. परंतू राज्यपालांनी असे वक्तव्य करताना त्यांना कोणी राज्यपाल म्हणून नेमले आहे ते पाहावे. केंद्रीय गृहमंत्री आणि पंतप्रधान यांनी त्यांना समज दिली पाहिजे कडक शब्दात सांगितले गेले पाहिजे एकदा चुक होऊ शकते. परत होत नाही राज्य सरकारचा त्यांना पाठीशी घालण्याचा निर्णय असेही अजित दादा पवार म्हणाले आहेत.
नागरिकांना परराज्यात जायची इच्छा : सीमा प्रश्नावर बोलताना माझे आणि शंभूराजे देसाई यांच्याशी बोलणे झालेले आहे. हा प्रश्न उच्च न्यायालयात असताना विनाकारण कर्नाटकचे मुख्यमंत्री यावर भाष्य करत आहेत. त्यांच्या राज्याचे काम करावे उद्या मी आणखी त्या ठिकाणी तिथल्या लोकांना भेटणार आहे. लोकांना कुठलीही गैरसोय होणार नाही ही दक्षता शासनाने घ्यावी. आमच्या काळात का झालं नाही असं म्हणाल तर, आमच्या काळात असा प्रश्न समोर आला नाही ,आता आला आहे तर कुठल्याही माणसाला तिथून परराज्यात जायची इच्छा होऊ नये अशी आमची मानसिकता आहे. ती व्यवस्था राज्य सरकारने घ्यावी अशी मागणी सुद्धा अजित दादा पवार यांनी आज पुण्यात केलेली आहे.
तारीख पे तारीख : राष्ट्रवादीचे नेते प्रशांत परिचारक यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी अजित दादा पवार आज पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमातून बोलताना आज राज्य सरकारमध्ये निवडणुका पुढे ढकलण्यासाठी तारीख पे तारीख दिले जाते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत नसल्यामुळे लहान कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. त्यांनाही तो अधिकार आहे. पण तो भेटत नाही, असे भाष्य केले.