ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यास हरकत नाही - अजित पवार

महाराष्ट्रातील यावेळची विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यास हरकत नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले. ईव्हीएमबद्दल अनेकांची वेगवेगळी मतं आहेत. त्यामुळे शंका दूर करण्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास हरकत नसल्याचे पवार म्हणाले.

अजित पवार
author img

By

Published : Jul 18, 2019, 12:49 PM IST

Updated : Jul 18, 2019, 1:26 PM IST

पुणे - महाराष्ट्रातील यावेळची विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यास हरकत नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले. ईव्हीएमबद्दल अनेकांची वेगवेगळी मतं आहेत. त्यामुळे त्यांची शंका दूर करण्यासाठी एका राज्याची निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी, असे पवार म्हणाले.

पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. जगामध्ये अनेक मोठ्या देशात मशीनद्वारे निवडणूक न घेता त्या बॅलेट पेपरवर घेतल्या जातात. त्यामुळे आपल्याही राज्यात बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास हरकत नसल्याचे पवार म्हणाले.

विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यास हरकत नाही - अजित पवार

मध्यंतरी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. निवडणुकांचे निकाल हे एकतर्फी लागल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. त्यामुळे ईव्हीएममध्ये निश्चित काहीतरी गडबड आहे. काही राजकीय पक्षांनी मागणी केली आहे की, लोकांच्या मनातील समज गैरसमज दूर करण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात. त्यामुळे कोणाच्या मनात शंका असतील तर त्या दूर होतील, असेही अजित पवार म्हणाले.

लोकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी एका राज्याची निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायला हरकत नाही. महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात का, असा प्रसारमाध्यमांनी प्रश्न केला असता, होय मी तेच म्हणतोय, असे अजित पवार म्हणाले.

Intro:mh_pun_01_ajit_pawar_press_avb_10002Body:mh_pun_01_ajit_pawar_press_avb_10002

टीप:-संबंधित बातमीचा बाईट आणि व्हिज्युअल्स हे नंतर पाठवत आहे याची नोंद घ्यावी

Anchor:- ईव्हीयम बद्दल अनेकांची वेगवेगळी मत आहेत त्यामुळे त्यांची शंका दूर करण्यासाठी एका राज्याची निवडणूक ही बॅलेट पेपर घ्यायला हरकत नसल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पावर म्हणाले आहेत. यावेळी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक घ्यायला हवी का असा प्रश्न केला असता हो मी तेच म्हणतोय असे म्हणाले पवार पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. अजित पावर म्हणाले की, जगामध्ये ताकदीच्या देशात मशीन द्वारे निवडणूक न घेता त्या बॅलेट पेपरवर घेतल्या जातात.
ईव्हीएम बद्दल अनेकांची वेगववगळी मत आहेत. मध्यंतरी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. तर एक तर्फी निवडणुकांचे निंर्णय लागले आहेत असे काही जणांचे म्हणणं आहे. त्यामुळे ईव्हीएम चा निश्चित काहीतरी गडबड आहे. काही राजकीय पक्ष्यांनी मागणी केली आहे की, किमान लोकांच्या मनातील समज गैरसमज दूर करण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूका तरी बॅलेट पेपरवर घ्याव्यात त्यामुळे कोणाच्या मनात असणाऱ्या शंका दूर होतील असे अजित पावर म्हणाले. चिप बदलली जाते, रिमोट ने काहीतरी केले जाते असे सांगितले गेल्यामुळे लोकांचा १०० टक्के गैरसमज दूर करण्याकरिता एका राज्याची निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायला हरकत नाही अस पवार म्हणाले तेव्हा पत्रकारांनी महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणूका बॅलेट पेपरवर घ्याव्यात का असा प्रश्न केला असता होय मी तेच म्हणतोय अस अजित पवार म्हणाले.

Conclusion:
Last Updated : Jul 18, 2019, 1:26 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.