ETV Bharat / state

'मित्रपक्षांचा भाजपने वापर केला, आता फेकून द्यायचे काम केले सुरू' - अजित पवारांची भिगवण येथे सभा

आज इंदापूर मतदार संघाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांंच्या प्रचारार्थ भिगवण येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली.

अजित पवार
author img

By

Published : Oct 17, 2019, 1:32 PM IST

Updated : Oct 17, 2019, 1:57 PM IST

पुणे - महायुतीतील घटक पक्ष असलेल्या सहकारी पक्षांच्या अवस्थेवर कोपरखळ्या मारत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले, रासपचे महादेव जानकरांची लोकं भाजपात नेत त्यांना भाजपच्या चिन्हावर लढवायला लावले, शिवसंग्रामचे विनायक मेटेंच काय झाले? तसेच आरपीआयचे रामदास आठवले यांना तर कवितेशिवाय काहीच सुचत नाही, त्यांना तर त्यांच्या पक्षाचे चिन्हही मिळत नाही, भाजप फक्त मित्र पक्षांचा वापर करत आहेत. वापरून झाल्यावर फेकून द्यायचे काम सुरू असल्याची टीका भाजपवर केली.

बोलताना अजित पवार

विधानसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना विविध पक्षांच्या नेते मंडळींची जोरदार टोलेबाजी सभांमधून सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील इंदापूर विधानसभा मतदार संघासाठी भिगवण येथे झालेल्या प्रचारसभेत भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

हेही वाचा - 'म्हशीपेक्षा रेडकू मोठं कसं?' शिखर बँकप्रकरणी अजित पवारांची भाजपवर टीका

यावेळी, सदाशिव खोतांची कडकनाथ कोंबडीने वाट लावली आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांच्या सांगली दौऱ्यातील त्यांच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या आणि अंडी फेकून मारल्याची आठवण करून दिली. तर शेतकऱ्यांचे कोणतेही प्रश्न आता तर मक्यावर "भाजप अळी" नावाची एक अचानक नवीनच अळी आली, असे म्हणत पीकांवरील हमीभाव आणि शेतकरी कर्जमाफीवरुन सरकारवर निशाना साधला.

हेही वाचा - 'पवारांच्या घड्याळाचे बारा वाजल्याने कोणीही हाताला घड्याळ बांधायला तयार नाही'

Intro:मक्यावर सध्या नवी अळी पडलीय, भाजप अळी, भाजपने सहकारी पक्षांना वापरून फेकून दिले- अजित पवारBody:mh_pun_01_ajit_pawar_tolebaji_avb_7210348

anchor

विधानसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना विविध पक्षांच्या नेते मंडळींची जोरदार टोलेबाजी सभांमधून सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील इंदापूर विधानसभा मतदार संघासाठी झालेल्या प्रचारसभेत भाजप सरकारवर जोरदार टीका केली तसेच भाजप सोबत असलेल्या सहकारी पक्षांच्या अवस्थेवर कोपरखळ्या मारत त्यांची खिल्ली उडवली रासपचे महादेव जानकर शिवसंग्राम चे विनायक मेटे तसेच आरपीआयचे रामदास आठवले यांच्या सध्याच्या अवस्थेवर टिपणी करत अजित पवारांनी एकच हशा उडवून दिला....
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांची भिगवण मध्ये प्रचार सभा पार पडलीय.. भारतीय जनता पक्षाचे केवळ वापरायचे आणि फेकून द्यायचे असे काम चालले आहे...विनायक मेटे,महादेव जानकरांची बिकट अवस्था केली असून रामदास आठवले तर नुसत्या कविताचं म्हणत बसलेत त्यांना त्यांच्या पक्षाचे चिन्हंच सापडत नाही. तर सदाशिव खोतांची कडकनाथ कोंबडीने वाट लावलीय म्हणत भाजपच्या मित्र पक्षांची खिल्ली उडवलीय...तर शेतकऱ्यांचे कोणतेही प्रश्न मुख्यमंत्र्यांनी सोडवले नाहीत आता तर मक्यावर " भाजप अळी" नावाची एक अचानक नवीनच अळी आलीय अशा शब्दात कर्जमाफी वरुन सरकारवर निशाना साधलाय...

Byte अजित पवार, नेते राष्ट्रवादी काँग्रेसConclusion:
Last Updated : Oct 17, 2019, 1:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.