पुणे - राज्यात वेदांत फॉक्सकॉन पाठोपाठ ( Vedanta Foxconn Project ) आता एअरबस हा प्रकल्प देखील गुजरातला ( Airbus project to Gujarat ) गेला आहे. यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली ( Aditya Thackeray criticized the rulers ) आहे. ते म्हणाले की, आम्ही सातत्याने या घटना बाह्य सरकारला सांगत होतो की, धक्कादायक म्हणजे हा प्रकल्प गुजरातला गेला आहे. मला सत्ताधाऱ्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की, राज्यात तरुण हुशार बेरोजगार नाही का? ज्यांना रोजगार पाहिजे. देशभरातील जे तरुण कामाच्या निमित्ताने आशेवर येणार आहे. त्यांचा काय होणार? हा चौथा प्रकल्प आहे जो राज्यातून निघून गेला आहे. याचा उत्तर कधीना कधी द्यावाच लागणार आहे असे, यावेळी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितल आहे.
शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान - परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसनेचे नेते आदित्य ठाकरे हे आज पुण्यातील शिरूर आणि जुन्नर येथील शेतीच्या पिकांची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की हे सत्ताधारी पक्ष नेहेमी म्हणत असतात की आमचं डबल इंजन च सरकार आहे.आमचं जेव्हा सरकार होत तेव्हा आम्ही 80 हजार कोटी आणि साडे सहा हजार कोटींची गुंतवणूक राज्यात आणली.पण आत्ता राज्य सरकारच जे इंजन आहे ते फेल इंजन आहे.जरी केंद्र सरकारच इंजन सुरू असला तरी राज्य सरकारचा इंजन फेल झाला आहे अशी टीका देखील यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली.