पुणे - महाराष्ट्रासारख्या शेती प्रगत राज्यातील शेती तंत्रज्ञान शेती पूरक उद्योग तसेच डेरीमधील तंत्रज्ञान काश्मीरमध्ये आणले गेले तर आम्हाला नक्कीच फायदा होईल, असे मत काश्मीरमधून पुण्याच्या दौऱ्यावर आलेल्या काश्मिरी शेतकऱ्यांनी मांडले आहे.
हेही वाचा - काँग्रेसला धक्का.. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बुधवारी करणार भाजपमध्ये प्रवेश
काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातून पुणे परिसरातील प्रगतशील शेती व्यवसायांचा अभ्यास करण्यासाठी शेतकरी आले आहेत. काश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर आता विकासाच्या दृष्टीने वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. डोडा जिल्ह्यातील दुर्गम भागातील काही शेतकरी डोडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तेथील कृषी अधिकारीऱ्यांच्या प्रयत्नाने पुण्यात अभ्यास दौऱ्यावर आले आहेत. 8 सप्टेंबर पासून 12 सप्टेंबर पर्यंत हे शेतकरी पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पुण्यातील कृषी महाविद्यालय जुन्नर येथील अत्याधुनिक डेरी फार्म फ्लोरिकल्चर तळेगाव येथील भाजी आणि फुलोत्पादन संस्था, सहकारी संस्था, सहकारी बँका अशा विविध ठिकाणी या शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहेत.
हेही वाचा - गणेशोत्सव २०१९ : पिंपरी-चिंचवडमध्ये बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज
हा आमच्यासाठी एक वेगळा अनुभव आहे, अशा प्रकारे शेती तंत्रज्ञान प्रगत होत असताना त्याचा फायदा काश्मीरलाही झाला पाहिजे. येथील तंत्रज्ञान काश्मीरमध्ये आले पाहिजे. त्यामुळे आम्हाला शेती करण्यासाठी आणि शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी मदत होईल, अशा भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील शेततळी हा प्रकार या काश्मिरी शेतकऱ्यांना विशेष आवडला. अशा प्रकारची शेतकरी योजना कश्मीरमध्येही असावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आमच्याकडील नाशवंत माल अधिक काळ टिकण्यास मदत होईल. फळांपासून प्रक्रिया उद्योग काश्मीरमध्येसुद्धा साकारला जावा, असेही मत या शेतकऱ्यांनी मांडले.