पुणे : पुण्यात राज्यपालांविरोधात ( Governor Controversial Statement ) मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झाला असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, सुधांशु त्रिवेदी, गोपीचंद पडळकर यांचा जाहीर निषेध करून जोडे मारो आंदोलन करण्यात आले आहे. ससाणे नगर शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण केला.
राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध - छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, सुधाशु त्रिवेदी, गोपीचंद पडळकर यांचा निषेध करण्यात आला आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या विरोधात आक्रमक होताना दिसत आहे. काल औरंगाबादमध्ये राज्यपाल आणि छत्रपती शिवाजी महाराज हे जूने आदर्श आहेत, आता नवे आदर्श गडकरी आणि शरद पवार हे तुमच्यासमोर बसले आहेत, असे विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमात वक्तव्य केले होते. त्या विरोधात आता संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत.
राज्यपालांना पदावरून दुर करण्याची मागणी - राज्यपाल भगतसिंग कोशायारी यांच्यासोबतच गोपीचंद पडळकर आणि सुधांशू त्रिवेदी यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे विधान केले, ते शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या आहेत. अशी सगळ्या मराठा ठोक मोर्चाची भूमिका आहे. त्यामुळे राज्यपालांना या पदावरून काढून टाकावे अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे.