ETV Bharat / state

BJP Yuva Morcha Protest : भारतीय जनता युवा मोर्चाचे आक्रमक आंदोलन, पुण्यात काँग्रेस भवन मध्ये घुसण्याचा प्रयत्न

author img

By

Published : Nov 18, 2022, 7:08 PM IST

राहुल गांधींनी केलेल्या सावरकरां (MP Rahul Gandhi) बद्दलच्या वक्तव्यावर पुण्यामध्ये आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आंदोलनाचे (Aggressive Protest of Bharatiya Janata Yuva Morcha) आयोजन केलं होतं. परंतु या आंदोलनाला अचानक आक्रमक स्वरूप प्राप्त झाले आणि कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवन मध्ये (attempt to enter Congress Bhavan) घुसण्याचा प्रयत्न केला. BJP Yuva Morcha Protest

BJP Yuva Morcha Protest
पुण्यात काँग्रेस भवन मध्ये घुसण्याचा प्रयत्न

पुणे : पुण्यात आज भारतीय जनता युवा मोर्चा ने काँग्रेस भवनावर जाऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला, हा भ्याड हल्ला असल्याचं काँग्रेसनं म्हणलं आहे. राहुल गांधींनी (MP Rahul Gandhi) केलेल्या सावरकरां बद्दलच्या वक्तव्यावर पुण्यामध्ये आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आंदोलनाचे (Aggressive Protest of Bharatiya Janata Yuva Morcha) आयोजन केलं होतं. परंतु या आंदोलनाला अचानक आक्रमक स्वरूप प्राप्त झाले आणि कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवन मध्ये (attempt to enter Congress Bhavan) घुसण्याचा प्रयत्न केला. BJP Yuva Morcha Protest

प्रतिक्रिया व्यक्त करतांना कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या

पूर्वीच पुणे पोलिसांकडून मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला होता. परंतु कार्यकर्ते निदर्शने करण्यासाठी आले आणि त्यांनी काँग्रेस भवनाच्या समोर मोठ्या प्रमाणात निदर्शने सुद्धा केले. आमच्या वीर पुरुषांचा आम्ही अपमान सहन करणार नाही, असं भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

बंदोबस्तानंतर सुद्धा काही कार्यकर्ते काँग्रेस भवन मध्ये घुसले. त्यानंतर त्यांना सुद्धा पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. या कार्यकर्त्यांना स्वारगेट पोलीस स्टेशनला नेण्यात आल्याची माहिती आहे.

खा राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी पुण्यामध्ये आक्रमक झाली असून; त्याने काँग्रेस भवन मध्ये घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही असाच धडा शिकवू, असा इशारा सुद्धा भारतीय जनता युवा मोर्चा ने दिला आहे. अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुण्यातल्या काँग्रेस भवन समोर अनिदर्शने करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. काँग्रेस भवन मध्ये ज्या गाड्या होत्या, त्या गाड्यांच्या वरती जे पोस्ट होते. त्याच्यावर सुद्धा आता काळे फासण्यात आले आहे. काही कार्यकर्ते मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता.

भारत जोडो यात्रेला आमचे सर्व कार्यकर्ते गेल्यामुळे, संधी साधून भारतीय जनता युवा मोर्चाने हा भ्याड हल्ला केला आहे. त्या हल्ल्याला भ्याड हल्ला म्हणावं लागेलं. हिंम्मत असेल तर समोर येऊन हल्ला केला असता, पाठीमागच्या बाजूने काही कार्यकर्ते घुसले आणि त्यांनी हे काळं फासण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेसने केलेला आहे. तर हिंम्मत असेल तर समोरून वार करा, असा इशारा सुद्धा काँग्रेसने दिला आहे. BJP Yuva Morcha Protest

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.