पुणे - तमाशा पंढरी, अशी ओळख असलेल्या नारायणगावात महाराष्ट्र राज्य तमाशा फड मालक व कलावंतांनी विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण केले होते. उपोषण सुरू केल्यानंतर दोन तासांत सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख यांच्या आश्वासनानंतर स्थानिक आमदार अतुल बेनके यांच्या उपस्थितीत उपोषण स्थगित केल्याचे रघुवीर खेडकर यांनी सांगितले.
- शासनाने कला व लोककला यांची अधिकृत घोषणा करावी
- तमाशासाठी एक वेगळे महामंडळ स्थापन करावे
- कलावंतांना टाळेबंदीच्या काळात दरमहा प्रत्येकी पाच हजारांची मदत मिळावी
- प्रत्येक फड मालकास तात्काळ आर्थिक पॅकेज जाहीर करावे
- फडमालकांच्या फड उभारणीसाठी 25 लाख रुपयांची रक्कम बँकेतून कर्जरूपी मिळावी
- टाळेबंदीनंतर लोककलेच्या कार्यक्रमास परवानगी द्यावी
- तमाशात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकार कामगारांना घरकुल व मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक तरतूद करावी
हेही वाचा - पुणे- सोलापूर महामार्ग : एका रात्रीत ३ भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू