ETV Bharat / state

व्हॉट्सअॅप स्टेट्स पाहून चोरले ३ कोटी रुपयांचे सोने - व्हॉट्सअॅप स्टेट्स पाहून चोरले 10 किलो सोने

सोने व्यापाऱ्यांचे व्हॉट्सअॅप स्टेट्स पाहून त्याला लुबाडणाऱ्या चार जणांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून 9 किलो 600 ग्रॅम वजनाचे 3 कोटी 70 लाख 71 हजार रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप स्टेट्स पाहून चोरले 10 किलो सोने
author img

By

Published : Nov 11, 2019, 7:53 AM IST

पुणे - सोने व्यापाऱ्यांचे व्हॉट्सअॅप स्टेट्स पाहून त्याला लुबाडणाऱ्या चार जणांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून 9 किलो 600 ग्रॅम वजनाचे 3 कोटी 70 लाख 71 हजार रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. गणेश दगडू पवार (वय 27), अभिजित उर्फ बाळू दिलीप चव्हाण (वय 23), मोहसीन हमजेखान मुलानी (वय 25), प्रथमेश विजय भांबुरे (वय 26) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आप्पा श्रीराम कदम यांनी दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

व्हॉट्सअॅप स्टेट्स पाहून चोरले 10 किलो सोने

हेही वाचा - सिगारेटचे पैसे मागितल्याच्या कारणावरून भावंडांना मारहाण; तिघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आप्पा व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवण्याची सवय आहे. आरोपींना अप्पा हा दौंड येथे उतरून सोने घेऊन जात असल्याची माहीती होते. काही दिवसांपूर्वी आप्पा यांनी 'गुड बाय कौठळी' असे स्टेटस ठेवले. आरोपी आप्पा यांच्या स्टेटसवर लक्ष ठेऊन होते. आप्पांचे स्टेटस अपडेट होताच आरोपींनी त्यांना लुटण्याचा कट रचला. 6 नोव्हेंबरला पहाटे पावणेसहाच्या सुमारास आप्पा आणि त्यांचे जोडीदार हे दोघेजण कोलकाता ते मुंबई या रेल्वेतून दौंड रेल्वे स्टेशनवर उतरले. रेल्वे स्टेशनच्या बाहेर आले असता आरोपींनी त्यांना गाठले. आप्पा आणि त्यांच्या साथीदाराला प्रवासी म्हणून कारमध्ये बसवून त्यांना कुरकुंभ, भिगवण मार्गे बांगरवाडी गावाच्या हद्दीत नेले.

हेही वाचा - 39 व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेचे पुण्यात आयोजन

प्रवासादरम्यान आरोपींनी आप्पांना मारहाण करून व चाकूचा धाक दाखवून त्यांचे मोबाईल फोन काढून फेकून दिले. पाकीट, सोन्याची बिस्किटे आणि रोख रक्कम असा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला. याबाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दौंड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींची ओळख पटवली. तसेच आरोपींना बेड्या ठोकल्या.

आरोपींकडून एम एच 14 / डी ए 6444 ही कार ताब्यात घेतली. त्यामध्ये तब्बल 9 किलो 500 ग्रॅम वजनाचे सोन्याची 29 बिस्किटे, सोन्याच्या तीन मोठ्या पट्ट्या, चार मोबाईल फोन, एक एअरगन असा एकूण 3 कोटी 70 लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हा गुन्हा शिताफीने दोन दिवसांमध्ये उघकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांच्या पथकाला 35 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

Intro:व्हाट्सअपचे स्टेट्स पाहून चोरले 10 किलो सोने, पोलिसांनी दोन दिवसात गुन्हा उघड करत चौघांना ठोकल्या बेड्या

सोने व्यापाऱ्यांचे व्हाट्सअप स्टेट्स पाहून त्याला लुबाडणाऱ्या चार जणांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले..त्यांच्याकडून 9 किलो 600 ग्रॅम वजनाचे 3 कोटी 70 लाख 71 हजार रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. गणेश दगडू पवार (वय 27), अभिजित उर्फ बाळू दिलीप चव्हाण (वय 23), मोहसीन हमजेखान मुलानी (वय 25), प्रथमेश विजय भांबुरे (वय 26) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी आप्पा श्रीराम कदम यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहेBody:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आप्पा यांना व्हाट्सअपवर स्टेटस ठेवण्याची सवय आहे. आरोपीना अप्पा हा दौंड येथे उतरून सोने घेऊन जात असल्याचे माहीत होते. काही दिवसांपूर्वी आप्पा यांनी 'गुड बाय कौठळी' असे स्टेटस ठेवले. आरोपी आप्पा यांच्या स्टेटसवर लक्ष ठेऊन होते. आप्पांचे स्टेटस अपडेट होताच आरोपींनी त्यांना लुटण्याचा कट रचला. 6 नोव्हेंबर रोजी पहाटे पावणेसहाच्या सुमारास आप्पा आणि त्यांचे जोडीदार हे दोघेजण कलकत्ता ते मुंबई या रेल्वेतून दौंड रेल्वे स्टेशनवर उतरले. रेल्वे स्टेशनच्या बाहेर आले असता आरोपींनी त्यांना गाठले. आप्पा आणि त्यांच्या साथीदाराला प्रवासी म्हणून कारमध्ये बसवून त्यांना कुरकुंभ, भिगवण मार्गे बांगरवाडी गावाच्या हद्दीत नेले.Conclusion:प्रवासादरम्यान आरोपींनी आप्पांना हाताने मारहाण करून व चाकूचा धाक दाखवून त्यांचे मोबाईल फोन काढून फेकून दिले. पाकीट, सोन्याची बिस्किटे आणि रोख रक्कम असा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला. याबाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दौंड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा समांतर तपास सुरु केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींची ओळख पटवली. तसेच आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपींकडून एम एच 14 / डी ए 6444 ही कार ताब्यात घेतली. त्यामध्ये तब्बल 9 किलो 500 ग्रॅम वजनाचे सोन्याची 29 बिस्किटे, सोन्याच्या तीन मोठ्या पट्ट्या, चार मोबाईल फोन, एक एअरगन असा एकूण 3 कोटी 70 लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हा गुन्हा शिताफीने दोन दिवसांमध्ये उघकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी त्यांच्या पथकाला 35 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.