ETV Bharat / state

पुण्यात स्मृती इराणींविरोधात खटला दाखल

२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात शिक्षणाबाबत खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याप्रकरणी हा खटला दाखल करण्यात आला आहे.

स्मृती इराणी
author img

By

Published : Apr 17, 2019, 5:32 AM IST

पुणे - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या भाजपा नेत्या स्मृती इराणी यांच्यावर शिवाजीनगर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात शिक्षणाबाबत खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याप्रकरणी हा खटला दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, प्रथम न्यायदंडाधिकारी बी.एस गायकवाड यांच्या कोर्टात मंगळवारी हा खटला दाखल करण्यात आला. मनसे महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रुपाली पाटील यांनी अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत मंगळवारी खटला दाखल केला. स्मृती इराणी यांनी त्यांच्या शिक्षणाविषयीची निवडणुक आयोगाला दिलेली माहिती ही चुकीची असल्याचे समोर आले आहे. तसेच, त्यांनी २०१४ च्या निवडणुकीतही खोटी माहिती दिल्याचेही उघडकीस आले आहे.निवडणुकीत फायदा मिळवण्याच्या उद्देशाने इराणी यांनी त्यांची २००४ मधील बी.ए.ची पदवी १९९६ मध्येच पूर्ण केल्याचे प्रतिज्ञापत्रात नमुद केले आहे. तर फिर्यादी यांनी संकेतस्थळावर इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना इराणी यांनी बीए पूर्ण केले नसल्याचे दिसून आले. याबरोबरच पदवीचे शिक्षण पूर्ण केले नसल्याचेही निदर्शनास आले. या फसवणूकीची लेखी तक्रार देऊन देखील खडक पोलीस स्टेशन याठिकाणी फिर्यादी यांच्या तक्रारीची नोंद घेण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारीसाठी न्यायालयात धाव घ्यावी लागल्याचे अर्जात नमुद करण्यात आले आहे.

दोन्ही प्रतिज्ञापत्रांमध्ये खोटी माहिती देत स्मृती इराणी यांनी मतदार यांची फसवणूक केली आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता हे प्रकरण खडक पोलीस स्टेशन यांच्याकडे तपासाकरिता पाठविण्यात यावे, तसेच हा खटला गुणदोषावर चालवून आरोपीला कडक शासन करण्यात यावे. असा विनंती अर्ज कोर्टाला सादर करण्यात आल्याचे अ‍ॅड. ठोंबरे पाटील यांनी सांगितले.

Intro:काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात अमेठीतुन निवडणूक लढवत असलेल्या भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शिक्षणाविषयी खोटी माहिती देऊन फसवणूक आणि विश्वासघात केल्याप्रकरणी शिवाजीनगर न्यायालयात इराणी यांच्या विरोधात दावा दाखल करण्यात आला आहे. 

यापूर्वीच्या 2014 निवडणूकीत देखील त्यांनी चुकीची माहिती देऊन मतदारांची दिशाभूल केली होती. बी. एस.गायकवाड यांच्या कोर्टात हा दावा दाखल करण्यात आलाय. अ‍ॅड. रुपाली पाटील यांनी इर
याविषयी फिर्याद दिली आहे. अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे पाटील हे
फिर्यादीकडून काम पाहत आहेत. Body:याविषयी अधिक माहिती देताना अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपूर्वी स्मृती इराणी यांनी त्यांच्या शिक्षणाविषयी माहिती लपविल्याची माहिती निवडणूक आयोगाला दिल्याचे समजले. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाला भेट दिल्यावर त्यांनी निवडणूकीमध्ये फायदा मिळविण्याच्या उद्देशाने 2004 मध्ये बी ए ची पदवी 1996 मध्ये पूर्ण केल्याचे प्रतिज्ञापत्रात नमुद केले. याच्या आधारे त्या महत्वाच्या पदावर मंत्री म्हणून कार्यरत  होत्या. फिर्यादी यांनी संकेतस्थळावर इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना त्यावर इराणी यांनी बीए पूर्ण केले नसल्याचे दिसून आले. याबरोबरच पदवीचे शिक्षण पूर्ण केले नसल्याचे निदर्शनास आले. या फसवणूकीची लेखी तक्रार देऊन देखील खडक पोलीस स्टेशन याठिकाणी फिर्यादी यांच्या तक्रारीची नोंद घेण्यात आली नाही. त्यामुळे तक्रारीसाठी न्यायालयात धाव घ्यावी लागल्याचे अर्जात नमुद करण्यात आले आहे.  Conclusion:दोन्ही प्रतिज्ञापत्रांमध्ये खोटी माहिती देत स्मृती इराणी यांनी मतदार यांची फसवणूक केली आहे. गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता हे प्रकरण खडक पोलीस स्टेशन यांच्याकडे तपासाकरिता पाठविण्यात यावे, तसेच हा खटला गुणदोषावर चालवून आरोपीला कडक शासन करण्यात यावे. असा विनंती अर्ज कोर्टाला सादर करण्यात आल्याचे अ‍ॅड. ठोंबरे पाटील यांनी सांगितले. 

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.