ETV Bharat / state

Pune News : एरोमॉडेलिंगच्या प्रात्यक्षिकामुळे बालपण झाले जागृत; शोमध्ये 3 हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग - childhood 3 thousand students

Pune News: यूथ ऑर्गनायझेशन फॉर ज्वाईनिंग अ‍ॅक्शन अ‍ॅण्ड नॉलेज (योजक) आणि बजाज ऑटो सीएसआरच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे प्रायोगिक तत्वावर सुरू केले. लर्निंग सेंटरच्या लाईफ कौशल्याशी निगडित टेक्नॉलॉजीशी निगडीत ‘एरोमॉडेलिंग शो’ चे आयोजन पिंपरी येथील एच.ए. मैदानावर करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

Pune News
Pune News
author img

By

Published : Dec 9, 2022, 4:16 PM IST

पुणे: विमानांचे आकर्षण काय असते, हे गडचिरोली येथे पाहण्यात आले. येथील माडिया जमातील विद्यार्थ्यांना भारत दर्शनासाठी नेले होते. परंतू त्यांना विमान आणि हेलिकॉप्टरमध्ये बसणे हे भारत दर्शनापेक्षा अधिक महत्वाचे वाटले. त्यांचा चेहर्‍यावरील आनंदाने सर्वांचे बालपण जागृत केले आहे. आज ही एरोमॉडेलिंगचे प्रात्यक्षिके पाहतांना बालपण जागृत झाले, असे भावूक उद्गार पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंग यांनी व्यक्त केले आहे.

एरोमॉडेलिंगच्या प्रात्यक्षिकामुळे बालपण झाले जागृत

विचारांचे नवीन पंख देण्यासाठी आयोजित: यूथ ऑर्गनायझेशन फॉर ज्वाईनिंग अ‍ॅक्शन अ‍ॅण्ड नॉलेज (योजक) आणि बजाज ऑटो सीएसआरच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे प्रायोगिक तत्वावर सुरू केले. लर्निंग सेंटरच्या लाईफ कौशल्याशी निगडित टेक्नॉलॉजीशी निगडीत ‘एरोमॉडेलिंग शो’ चे आयोजन पिंपरी येथील एच.ए. मैदानावर करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांना वैज्ञानिक विचारांचे नवीन पंख देण्यासाठी आयोजित या शोमध्ये विमान मॉडेल्सच्या उड्डाणाचे रोमांचक प्रात्यक्षिक होते. यावेळी पीसीएमचे ३ हजार विद्यार्थ्यांनी शोचा आनंद लुटला. मनपातर्फे एज्यूकेशनल कार्निवलचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यावेळी याचा शेवट एरोमॉडेलिंग शोच्याद्वारे करण्यात येईल. तंत्रशिक्षणाचा ध्यास,करी जीवन विकास हा देण्यात आलेला संदेश विद्यार्थ्यांच्या जीवनासाठी खूप मोठा आहे.

स्मार्ट पिढी घडविण्याच्या दृष्टीने आमचे कार्य: अतुल इनामदार म्हणाले, एरोमॉडेलिंग शो हा कल्पनांना भरारी देणारा आहे. संस्थेच्या माध्यमातून पीसीएमसी भागातील वस्त्यामधील लर्नींग सेंटरमध्ये मुलांना तांत्रिक उपकरणे हाताळता येणार आहेत. शासन, सीएसआर व झपाटलेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून स्मार्ट पिढी घडविण्याच्या दृष्टीने आमचे कार्य सुरू आहे. आज संस्थेमध्ये १०० पेक्षा अधिक कार्यकर्ते काम करत आहेत.

तंत्रज्ञानाचे धडे दिले जात : भुपाली म्हस्कर म्हणाल्या, विद्यार्थ्यांना विमानांचे आकर्षण आहे. शोच्या माध्यमातून त्यांचा सर्वांगिण विकास होऊन त्यांच्या कल्पनांना आकार देणे, त्यांची विज्ञान व तंत्रज्ञानातील रूची वाढविण्याचा प्रयत्न आहे. यासाठी बजाजतर्फे सर्व प्रकारची मदत करण्यात येत आहे. रेणू इनामदार म्हणाल्या की, योजक स्वयंसेवी संस्था जिल्ह्यातील आदिवासी आणि झोपडपट्टीतील असुरक्षित समुदायांना शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञानाबद्दल सक्षम बनविण्याचे कार्य करीत आहे. आज पीसीएमसी व बजाजच्या सीएसआरतर्फे देण्यात आलेल्या आर्थिक मदतीने १२ वस्ती पातळीवरील लर्नींग सेंटरमध्ये ८ वी ते १० वीच्या १५०० विद्यार्थ्यांना रोज २ तास विज्ञान व गणिताचे शिक्षण दिले जाते. तसेच आठड्यातून एकदा तंत्रज्ञानाचे धडे दिले जात आहेत. बिना जोशी म्हणाल्या, योजकने सुरू केलेल्या प्रकल्पाने उंच भरारी घेतली आहे. पण त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक समस्यांना टक्कर देण्याची प्रेरणा जागृत केली आहे. येथील शो पाहून आज खर्‍या अर्थाने बाल दिवस साजरा करत आहोत.

१५ विमाने व ७ फायटर विमानांचे प्रात्यक्षित: पिंपरी येथील एच.ए. मैदानावर सातार्‍याहून विशेष एरोमॉडेलिंगचा शो दाखविण्यासाठी आलेले सदानंद काळे व अर्थव काळे यानी विद्यार्थ्यांना जवळपास १५ विमाने व ७ फायटर विमानांचे प्रात्यक्षित दाखविले. येथे फ्लाईग गरूड, ग्लायडर, इंडियन एअर फोर्सचे मीग २१, मीग २९, सुखोई, तेजस, जग्वार विमान आणि ट्रेनर प्लेन सारख्या विमानांचे प्रात्यक्षित दाखविले. या पुढे जाऊन लर्निंग सेंटरमध्ये किमान मॉडेल जोडणीे कार्यशाळाचे आयोजन संस्थेकडून करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.